सापटगाव जत्रेतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

Tuesday, January 29, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील सापटगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुरू असल्याने तरूण वर्गामध्ये एचआयव्हीची मोठ्या प्रमाणात लागत होत आहे. त्यामुळे सदरील व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यपाल, मुख्यमंंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

सेनगाव तालुक्यातील कोळसा, सापटगाव येथे मसोबा आणि मसाई या देवस्थानानिमित्त जत्रेचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी मनोरंजनासाठी तमाशाचे फडही आले आहेत. पण या तमाशाच्या फडामध्ये मोठा वेश्याव्यवसाय सुरू झाला आहे. याकडे तरूण वर्ग आकर्षित होत असल्याने एचआयव्ही संसर्ग होत आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हा सर्व प्रकार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येत असून जनतेचे आर्थिक लूट होत आहे. याची दखल घेत सापटगाव जत्रेच्या संचालक मंडळास हे बंद करण्यासाठी तात्काळ सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यपाल, मंत्र्यामंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख विजय राऊत, युवा जिल्हाप्रमुख रवि बांगर, विलास आघाव, केशव गायवाळ, रमेश कोरडे, रमेश मांडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment