नाभिक महामंडळाकडून त्या घटनेचा निषेध

Tuesday, January 29, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पाटणा तालुक्यातील ढेबेवाडी येथील नाभिक समाजाच्या मुलीवर झालेला अत्याचार व मृत्यू या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून सदरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी 28 जानेवारी रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडून सदरील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून करण्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद हिंगोली जिल्ह्यात उमटले असून सदरील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. संबंधित घटनेतील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवत आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश सरचिटणीस रेणुकादास वैद्य, जिल्हाध्यक्ष अशोकराव गुळगूळे, युवा जिल्हाध्यक्ष गजानन मोरे, नाईकवाडे, माणिकराव घोडके, राम वानखेडे, संतोष कुबडे, विनोद कुबडे, विनोद गोरे, भाऊराव शेळके, अमोल पवार, अशोक मांदळे, योगेश अंभोरे, अनिल दळवी, गजानन पवार, चक्रधर सोनूळे, मोतीराम मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment