नांदेडमध्ये तीन कॉफी शॉपवर धाड, चौदा जण पकडले

Wednesday, January 30, 2019


नांदेड : शहरातील भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतील कॉफी शॉपवर धाड टाकून ९ तरुणांसह पाच तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये काहीजण अल्पवयीन असल्याचेही समजते. 

 काबरानगर परिसरात कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या दुकानांमध्ये तरूण- तरूणींसह महाविद्यालयीन मुली अश्लील चाळे करीत बसत असल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम यांच्या पथकाने जवळपास तीन कॉफी शॉपवर धाडी टाकून झाडाझडती केली.

यावेळी अंधारमय रूम कॅबीनमध्ये एक मुलगा एक मुलगी अशा जोड्या आढळून आल्या. तर काही ठिकाणी पोलीस कर्मचारी जवळ गेल्यानंतरही तरूण - तरुणींचे अश्लील चाळे सुरूच होते. दरम्यान, पोलीस कर्मचा-यांनी जवळपास ९ मुले आणि ५ मुली आणि तीन कॉफी शॉपचालकांना ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता कदम यांच्या पथकाने केली.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 7083550505 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment