लातुरात जुगाराच्या छाप्यात् ५ लाखांचा मुद्देमाल जप्त; ३५ जणांविरुद्ध गुन्हा

Wednesday, January 30, 2019


लातूर : शहरातील १ नंबर चौकात एका लॉजवर सुरू असलेल्या, जुगारावर उस्मानाबाद येथील विशेष पोलीस पथकाने सोमवारी रात्री छापा मारला. या प्रकरणी मंगळवारी पहाटे ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने एकूण ४ लाख ८५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

 वरिष्ठ पोलीस अधिका-यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे उस्मानाबाद येथील एका विशेष पथकाने सोमवारी रात्री लॉजवर छापा मारला. यावेळी ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले होते . दरम्यान , ४ लाख ८५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात उस्मानाबाद येथील सपोनि. गणेश अर्जुन मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३५ जुगाऱाच्यांविरुद्ध मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यांत आला. पुढील तपास सपोनि . पडवळ हे करीत आहेत.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 7083550505 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment