Tuesday, January 1, 2019January 01, 2019
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील डायलॉग पाहून प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिकाही दमदार पद्धतीने साकारली आहे. पण प्रेक्षकांना एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज..
बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती, ती या ट्रेलरमध्ये दिसून न आल्याने प्रेक्षक कमालीचे नाराज झाले. प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांचा सिनेमातील आवाज बदलण्याचीही मागणी केली. अखेर ही मागणी निर्मात्यांच्या कानावर पडल्याचं कळतंय. या सिनेमात बाळासाहेबांचा आवाज डबिंग आर्टिस्ट चेतन सशीतल यांच्याकडून डब करुन घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे
बाळासाहेब ठाकरे यांचा 'आवाज' परतणार?

By Marathwada Neta
Tuesday, January 1, 2019
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील डायलॉग पाहून प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिकाही दमदार पद्धतीने साकारली आहे. पण प्रेक्षकांना एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज..
बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती, ती या ट्रेलरमध्ये दिसून न आल्याने प्रेक्षक कमालीचे नाराज झाले. प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांचा सिनेमातील आवाज बदलण्याचीही मागणी केली. अखेर ही मागणी निर्मात्यांच्या कानावर पडल्याचं कळतंय. या सिनेमात बाळासाहेबांचा आवाज डबिंग आर्टिस्ट चेतन सशीतल यांच्याकडून डब करुन घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment