सत्यजीत बद्दर
जालना दि
होय आम्हाला युती हवी आहे या देशा च्या कल्याणासाठी युती हवी आहे , हिदुत्व एकत्र राहिली पाहिजे या साठी युती हवी आहे ज्यांनी या देशाला लुटण्याचे काम केले त्याच्या हाती सत्ता जाऊ नयेत , ज्यांची डोकी हॅक झाली आहेत त्याच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून युती हवी आहे . पाकिस्तान धरजीं आहेत त्याच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत पण कोणाला असे वाटत असेल भारतीय जनता पक्ष लाचार आहे; तर हा पक्ष अटल बिहारी बाजपेयी , नरेंद्र मोदी यांचा पक्ष आहे हा पक्ष कधीच लाचार होणार नाही आम्ही शून्यातून जग निर्माण करणारे लोक आहोत. आमचे २ निवडून आले त्या वेळी लोकांनी सांगितले पक्ष संपला २ पासून २८५ पोहचलेला हा पक्ष आहे युतीची काळजी करू नका ज्यांना हिंदुत्ववाद पाहिजे ते आपल्या सोबत येतील ज्यांना हिंदुत्ववाद नकोय ते हिंदू विरोधकासोबत जातील जे येतील त्यांना घेऊन जे नाहीत त्यांना सोडून या देशाकरता लढल्याशिवाय या देशात मोदीजींचे सरकार स्थापन केल्या शिवाय भाजप चा कार्यकर्ता आता थांबणार नाही आणि म्हणून प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये भाजपमय करा भारत मातेची सेवा करण्यासाठी भारत मातेचा सुपुत्र नरेंद्र मोदी यांना विजयी करा असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना या ठिकाणी भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये ते बोलत होते.
एकमेकांचे तोड न बघणारे लोक एकत्र येत आहेत नीती नियम धोरण मोदीजी हटाव या मुले एकत्रित आले नाहीत तर मोदींच्या भीतिपोटी ते एकत्रित आले आहेत पुढच्या ५ वर्षात आपले अस्तित्व उरणार नाही म्हणून हे सर्व एकत्रित आले आहेत
देशाचा विकास याचे ध्येय नाहीये भारताला विकास हे सुध्या यांचे ध्येय नाही तर यांचे ध्येय मोदी हटाव आणि मला खुर्ची कशी मिळेल हेच यांचे ध्येय आहेत माझा हाच सवाल आहे ३४ पक्षाची खिचडी आहे तुमचा नेता कोण आहे हे तरी ठरवून दाखवा हे सर्व राज्याचे नेते आहेत यांना बाहेर कोणी ओळखत नाहीत महागठबंधं नव्हे महा ठगबंधन आहे . आपला पक्ष हा परिवाराचा पक्ष नाहीये आपला पक्ष जा जनतेचा पक्ष आहे , सामान्य माणसाचा पक्ष आहे ध्येय आणि देशासाठी आपला पक्ष काम करतोय . या देशातला तरुण , शेतकरी गरीब प्रत्येक व्यक्ती हा मोदीसरकारच्या पाठीशी आहे असे मुखमंत्री फडणवीस म्हणाले
स्वामीनाथन आयोग आम्ही लागू केला
२००६ ते २०१४ पर्यंत कोणाचे सरकार होते कोण कृषिमंत्री होते कोणाची सत्ता होती आम्ही सत्तेवर येताच स्वामीनाथन आयोग लागू केला आम्ही नाही संगतीतले हे स्वतः स्वामीनाथन यांनी दैनिकातून लेख लिहून सांगितले तेव्हा पासून यांच्या तोंडाला लकवा मारला ते आता स्वामिनाथन आयोगाबद्दल काहीच बोलत नाहीत
खुले आव्हान या मंचावर आणि चर्चा करा
आघाडीच्या काळात पीकविमा चे किती पैसे मिळायचे एकूण १५ वर्षात १६०० कोटी मिळाले मोदींच्या ३ वर्षात शेतकऱ्यांना मिळाले १२ हजार कोटी रुपये दिले हे काम या सरकारने केले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले
सल्ले देत बसू नका
काय झालंय ते पोचावा सल्ले देत बसू नका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा १ प्रॉब्लेम आहे झाले ते न सांगता काय झाले नाही हे सांगण्यात धन्यता मानतो १० पैकी ८ कामे झाली असली तरी ते तो सांगत नाही तर २ झाल्या नाहीत त्याचाच बोलबाला करतो त्या जरूर सांगा आम्हाला सांगा आम्ही त्या पुढच्या टर्म मध्ये करू जे झालाय ते कार्यकर्त्यांनी घरी जाऊन सांगणे गरजेचे आहे असेही या वेळी मुख्यमंत्री म्हणाले
तो पर्यंत कर्जमाफी मिळणार
जो पर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना बंद केली जाणार नाही
ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हा
२१ वे शतक हे भारताचे शतक असेल हे स्वामी विवेकानंद म्हणाले होते. पुढील पाच वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकारू शकतो असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. २०१४ ला आपण इतिहास घडवला, त्याचे आपण साक्षीदार होतो. आता २०१९ च्या निवडणुकाही आपल्याला अशाच ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हायचे आहे. ही निवडणूक २०१४ च्या परिवर्तानवर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक ठरणार आहे. नाद घुमूदे, कमळ फुलू दे या या प्रचारगीताचं उद्घाटनही याचवेळी करण्यात आलं.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment