मुख्याध्यापकाची शाळेत आत्महत्या

Tuesday, January 15, 2019
उस्मानाबाद :- जिल्हा परिषद शाळेच्या ४ वर्गांसाठी एक शिक्षक असल्याने आलेला ताण, गेल्या वर्षी मुलाचा झालेला अकाली मृत्यू यामुळे व्यथित एका मुख्याध्यापकाने शाळेतच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विजोरा येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. 


मूळचे धुळे येथील रहिवासी असलेले आनंदा राजाराम बागुल (४८) असे मृताचे नाव आहे. गेल्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रशासनाकडे अर्जही दिला होता. विजाेऱ्याच्या शाळेतील एकमेव शिक्षक बागुल यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचाही पदभार हाेता. 

पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग ते एकटेच सांभाळत. पत्नी व दाेन मुलींसह ते गावातच भाड्याच्या घरात राहत हाेते. साेमवारी पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले, परंतु ८ वाजेपर्यंत परतलेच नाहीत.

 कुटुंबीयांनी शाेधाशाेध केली असता शाळेतच गळफास घेतलेल्या अवस्थेत ते अाढळून आले. 'शाळेचा ताण, शारीरिक व्याधींसह मुलाच्या मृत्यूमुळे आलेल्या नैराश्याने आत्महत्या करत आहे,' अशी चिठ्ठी त्यांच्याजवळ सापडली.

No comments:

Post a Comment