नागपूर, दि. 21 :....
केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात लातूर येथे विविध विकास कामाचा शुभारंभ होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे प्रयत्न असल्याचे वृत्त आहे.
लातूर जिल्ह्यात विविध राष्ट्रीय महामार्गाचे कामे सुरु होणार आहेत. तसेच शहरातील राष्ट्रीय महामार्ग व नाट्यगृह, शादीखाना तसेच लोदगा येथील विविध प्रकल्पाचे उद्घाटन यासंदर्भात गतीने चक्र फिरत आहेत.
ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या एकंदरीत कामाची पद्धत पाहता अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी पाठपुरावा केला म्हणूनच लातूर येथे देशातील मोठा बोगी प्रकल्प प्रत्यक्षात सुरु झालेला आहे.
विविध उपक्रम राबवले जात आहेत. लातूर जिल्हा रुग्णालय, क्रिडा संकुल भूमिपूजन यासह लातूर येथे उभारण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या शासकीय रुग्णालयाची इमारत अंतीम टप्प्यात असून या विविध विकास कामाचे उद्घाटन व शुभारंभ होणार आहेत. त्या दृष्टीकोणातून चक्रे गतीने फिरत आहेत. येणार्या 3-4 दिवसांत हे उद्घाटन डिजीटल स्वरुपात करायची असल्यामुळे हा नेमका कार्यक्रम कोठे होणार व कशाकशाची उद्घाटने होणार हेही येणार्या दोन-तीन दिवसात निश्चित होईल. एकंदरीत लातूर जिल्ह्यात विविध विकास कामाचा वेग वाढवण्यासाठी ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 7083550505 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment