मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

Thursday, December 20, 2018
हैदराबाद: एका खासगी संस्थेत काम करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली . संस्थेत वरिष्ठांकडून होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548 हा आमचा नंबर

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी(दि.18) त्याने सैदाबाद परिसरातील राहत्या घरात गळफास घेतला . नरसिंग असं त्या तरुणाचं नाव आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये वरिष्ठांकडून छळ केला जात असल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्याने लिहिलंय. 

याशिवाय, पंतप्रधान मोदी हेच देशाचे कायम पंतप्रधान राहावे.मोदीच देशाला वाचवू शकतात असंही त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमुद केलंय अशी माहिती तपास करणारे पोलीस निरीक्षक एन. मोहन राव यांनी दिली .

‘त्याला राजकारणाबद्दल आवड होती आणि राजकारणाबद्दल स्वतःचे मत तो नेहमी मांडायचा’ असंही राव यांनी सांगितलं.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

No comments:

Post a Comment