दीड महिन्यात शहरातील पाचवी घटना; पोलिसांनी केला पाठलाग; आरोपी पकडण्यात अपयश
विशेष प्रतिनिधी
नांदेड-गेल्या दिड महिन्यापासून सतत होणार्या गोळीबारांच्या घटनेमुळे नांदेड शहर हादरुन गेले असतानाच रविवारी पाहटे गुरुव्दारा परिसरात तीन पंजाबी इसमांनी गुरुव्दार्याच्या सुरक्षा रक्षकाच्या दिशेने पिस्टलमधून दोन राऊंड गोळ्या झाडल्या. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेने गुरुव्दारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड-गेल्या दिड महिन्यापासून सतत होणार्या गोळीबारांच्या घटनेमुळे नांदेड शहर हादरुन गेले असतानाच रविवारी पाहटे गुरुव्दारा परिसरात तीन पंजाबी इसमांनी गुरुव्दार्याच्या सुरक्षा रक्षकाच्या दिशेने पिस्टलमधून दोन राऊंड गोळ्या झाडल्या. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेने गुरुव्दारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबार केल्यानंतर या तिन्ही हल्लेखोरांनी होंडासिटी कारमधून पळून गेले.गेल्या दीड महिन्यात शहरात घडलेल्या वेगवेगळ्या तीन गोळीबार प्रकरणातील शस्रे कुठून आली, याचा शोध लागलेला नसतानाच रविवारी पहाटे गुरुद्वारा परिसरात अज्ञात तिघांनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गोळीबार करणार्यांचा पाठलाग केला खरा, परंतु पसार होण्यात ते यशस्वी झाले.
नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून गोळीबारांच्या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. व्यावसायिक सुरेश राठोड, आशिष पाटणी यांच्यावर गोळीबार झाला. शिवाय गोवर्धन घाट परिसरात गेल्या आठवडयात काहींनी अति उत्साहात गोळीबार केला. पोलिसांनी या प्रकरणात काहींना अटकही केली. परंतु, त्यांच्याकडे आढळलेली शस्रे कुठून आली होती. याचा अद्याप शोध लागला नाही. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास जैसे थे अवस्थेत आहे. शहरात सर्रासपणे पिस्टल, गावठी बंदुकीचा वापर होत असल्याने भितीचे वातावरण कायम आहे.
रविवारी मध्यरात्री गुरुद्वाराचे सुरक्षा रक्षक तेजिंदरसिंघ हे रात्रपाळीत ड्युटीवर होते. गेट नं. पाच जवळ तेजिंदरसिंघ मोहनसिंघ , मोनूसिंघ गाडीवाले, राजिंदरसिंघ व गुरूप्रितसिंघ कारपेंटर हे गुरुव्दाराचे कर्मचारी थांबले होते. गुरुव्दारा परिसरात एका कारजवळ तीन युवक सिगारेट ओढत होते. या चौघांनी त्यांना हटकले. या भागात तंबाकू, सिगारेटला मनाई आहे, असे म्हणताच तिघांपैकी एकाने स्वत: जवळील बंदुकीने गोळी झाडली.
सुदैवाने ही गोळी कोणालाही लागली नाही. त्यानंतर आरोपीने पुन्हा एक राऊंड झाडला. या घटनेनंतर आरडा ओरड झाली. काही नागरिक घराबाहेर पडले. गोळीबार करुन आरोपी कारमधून पसार झाले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी नाकाबंदी केली. शिवाय इतवारा, भाग्यनगर, गुरुद्वारा सुरक्षा पोलिस व शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने आरोपींच्या कारचा अर्धापूर फाटा मार्गे वसमतपर्यंत पाठलाग सुरु केला मात्र आरोपीच्या होंडासिटी गाडीच्या वेगाने पोलिसांचे वाहन पळत नसल्यामुळे ते पसार झाले.
गुरुद्वारा बोर्डाच्या संचालक मंडळाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. असे असतांना पोलिसांच्या नाकावर टिचून गोळीबाराची घटना घडल्याने या परिसरातील नागरिकांत दहशत पसरली आहे..
या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात फिर्यादी तेजिंदरसिंघ यांच्या तक्रारीवरुन त्या तीन अज्ञात हल्लेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वापरलेली होंडासिटी ही गाडी चंदीगड पासिंगची असून आरोपी पंजाबी भाषेत संभाषण करीत असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.
No comments:
Post a Comment