सांगलीःप्रतिनिधी
शेतकर्यांसाठी एक सूचना आहे, शेतकर्यांनी ऊस लावू नका, साखरेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ती आणखी जास्त झाली तर ती समुद्रात टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे आज सांगली येथे बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
शेतकर्यांनी आंदोलन करू नये. ऊस लावायचे बंद करावे, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, हिजड्याशी लग्न होईल पण हे प्रकल्प पूर्ण होणार नाहीत. असे एकजण माझ्यासमोर बोलले होते.
पण हे प्रकल्प पूर्ण होत असल्याचे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले. जुन्या सरकारने दगडं उभा करून स्मारक उभा केली आणि पैसे गोळा केले, पण आम्ही सिंचनाची कामे केली आहेत. छाती ठोकून मी सांगतो एक टक्का पण आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही. आम्ही ठेकेदाराला ठणकावून कामे करून घेत असतो असेही गडकरी यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, नदी जोड प्रकल्प आम्ही सुरू केला आहे. कारण, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आम्ही केलेल्या कामाचा प्रचार करण्याची गरज आम्हाला नाही. लोकांच्या मनात आमचे काम नक्की बसेल असा दावाही त्यांनी केला. सांगली जिल्ह्यात 10 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment