राफेल : सरकारची अग्निपरिक्षा कॅगने संरक्षण मंत्रालयाला दिला रिपोर्ट

Monday, December 17, 2018

राफेल खरेदीवर देशात सुरू असलेलं वादळ शांत होण्याची चिन्हे नाहीत. त्यातच आता नियंत्रक- महालेखापरीक्षकांनी म्हणजेच कॅगने आपल्या अहवालाचा पहिला ड्राफ्ट संरक्षण मंत्रालयाला पाठविला आहे. सरकारला त्यावर चार दिवसात उत्तर द्यावं लगाणार आहे. राफेलच्या किंमतीबाबत काँग्रेसने सरकारवर गंभीर आरोप केले होते. विमानाची किंमत वाढवून दिल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे या अहवलाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सरकारने उत्तर दिल्यानंतर पुन्हा कॅग आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे.

हा अहवाल आल्यानंतर तो संसदेत मांडावा लागतो. मात्र या अधिवेशनात हा अहवाल मांडाला जाण्याची शक्यता नाही.

No comments:

Post a Comment