शिवसेनेच्या 'कोस्टल रोडला' मनसे चा विरोध

Saturday, December 15, 2018


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोडला मनसे विरोध करण्याची शक्यता आहे. वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे कोळी बांधवांच्या वतीने मनसे आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हं आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन १६ डिसेंबरला दुपारी होणार आहे. याच दिवशी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोळीवाड्याला भेट देऊन येथील स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

कोस्टल रोड प्रकल्पाला सर्व परवानगी मिळाल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे नरिमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंतचा ३५.६ कि.मी. लांबीचा प्रवास सागरी किनारी रस्त्याने म्हणजेच कोस्टल रोडने होणार आहे. मात्र वरळी कोळीवाड्यातील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने प्रकल्पाच्या मार्गात अडचण निर्माण झाली आहे. समुद्रात भराव टाकून तयार केला जाणारा हा प्रकल्प समुद्रावर ज्यांचं पोट अवलंबून आहे, अशा कोळी बांधवांना नकोसा झाला आहे.

शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ असलेल्या कोळीवाड्यातून प्रकल्पाला विरोध होत असल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे. त्यात काही कोळीबांधवांनी आपले गा-हाणे नुकतेच राज ठाकरे यांच्याकडे मांडले. ज्या दिवशी या प्रकल्पाचे भूमिपूजन आहे त्याच दिवशी राज कोळीवाड्यात जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार आहेत.


No comments:

Post a Comment