रामकथा ज्ञानयज्ञाचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते भूमिपूजन

Thursday, November 22, 2018
छाया : शाम भट्टड़ 

लातूर, दि. 22 ः....
येथे डिसेंबर महिन्यात होणार्‍या रामकथा ज्ञानयज्ञाचे मंडप भूमिपूजन विठ्ठल रुक्मिणी देवस्थासनेच सहअध्यक्ष व नाथ संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर संपन्न झाले.

लातूर येथे हरिकिशनजी मालु मुख्य संयोजक असलेल्या प.पू. रमेशभाई ओझा यांच्या कथेचा भव्य सत्संग सोहळा दि. 14 ते 21 डिसेंबर पर्यंत बालाजी मंदिर परिसरात संपन्न होत आहे. कथेची वेळ दुपारी 3 ते 6 आहे. रमेशभाई ओझा यांची कथा म्हणजे एक साक्षात देववाणी असल्यासारखीच असते आणि या कथेच्या मुख्य यजमान आणि संयोजक हरिकिशनजी मालु, तळणीकर व रमण मालू आणि मालु परिवार आहे. आज पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची महती ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितली. घरात ग्रंथ ठेवला तर ब्रह्म हत्त्येचे पातक नष्ट होते. भागवत कथा ऐकली तर देव त्यांच्याकडे येतो हे सांगत ह.भ.प. गहिनीनाथ महाराज म्हणाले की, मनोनिग्रह आणि इंद्रियनिग्रह हा कथा ऐकताना गरजेचे आहे. 

कथेमुळे पुण्याचा साठा वाढतो, मल काढून विमल मन होते. अहंकाराची आहुती देवून पापाचा गाठोडं सोडून पुण्य कर्म आपल्या हातून घडते, हे सांगत संत संगतीला भाग्य लागते. माझा कार्यक्रम मग्न असताना मला याठिकाणी जे निमंत्रण दिलं मी माझंही भाग्य समजते की, माझ्या हातून ही सेवा घडत आहे. मी प्रत्येक वारकरी हा विठ्ठल समजतो आणि लातूरकरांचं श्रद्धास्थान असलेल्या बालाजी मंदिराच्या परिसरात ही कथा ज्ञानयज्ञ होत आहे हेही फार महत्त्वाचं आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण विचार ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मांडले. यावेळा रमण हरिकिशनजी मालु, हरिकिशनजी मालु यांनी महाराजांचे स्वागत केले. यावेळा त्यांचे आप्तेष्ट भंडारी हे व्यासपीठावर उपस्थित होते. ह.भ.प. ममदापूरकर महाराजही व्यासपीठावर उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळ्यास लक्ष्मीरमण लाहोटी, श्रीकिशनजी लाहोटी, रो. हरिप्रसाद सोमाणी, सुरेश मालू, ईश्‍वर डागा, राजकुमार मालपाणी, शामशेठ बियाणी, राज बियाणी, डांगे, बुलबुले, कोरे, हरिषभाई ठक्कर, कांताप्रसाद राठी, सनरिचवाले मुंदडा, किशोरभाई जोईशर, तापडीया, लोया, भार्गव, बांगड, योगासनवाले भातलवंडे, लक्ष्मीकांत सोनी, नंदकिशोर पुनपाळे, रामेश्‍वर तिवारी, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष अग्रवाल सह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. यावेळा श्रद्धा, भक्तिपूर्वक मंडप पूजन झाले. संचलन प्रा. बाहेती यांनी केले. 

लातूर येथे सातत्याने सत्संग होत असतात. प.पू.रमेशभाई ओझा हे देशातील नामांकीत कथाकारापैकी एक आहेत. ही सत्संगाची मेजवानी म्हणजे लातूरकरांना एक सुवर्णसंधी हरिकिशनजी मालु, रमण मालु यांनी आणून दिलेली आहे. या कथेसाठी मराठवाड्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतील. लातूरकर या कथेसाठी आतूर आहेत. आणि ही कथा भव्य दिव्य व्हावी. राष्ट्रउभारणी, समाजनिर्मिती, बंधुभाव, अध्यात्म, विज्ञान याची सांगड घालणारी श्रीमद भागवत कथा प.पू. रमेशभाई ओझा हे सांगत असतात. त्यांची मधुर वाणी ही कथा लातूर येथे, तिरुपती येथे ऐकण्याचा योग आला. देशात आणि देशाबाहेर त्यांच्या अनेक कथा झालेल्या आहेत आणि आजच्या त्रिपुरा पौर्णिमेच्या मुहूर्तावर कथा मंडप भूमिपूजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment