हिंगोली / प्रतिनिधी
शहर पोलीस ठाण्याअंतर्गत दोन महिन्यात दोन कर्मचारी लाचखोर प्रकरणात आडकल्याने संतप्त झालेल्या पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंदेल यांची 22 नोव्हेंबर रोजी नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली असून अशोक मैराळ यांच्याकडे शहर पोलीस ठाण्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर पोलीस खात्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी झालेल्या बैठकीत अवैध धंद्याबाबतही ठाणेदारांना कडक सुचना दिल्या जातात. तसेच या पुर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांना एखाद्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या विरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यास सदरील ठाणेदाराचा कर्मचाऱ्यावर वचक नाही, कमकुमव पर्यवेक्षन असे गृहीत धरून कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी एका कर्मचाऱ्याविरूद्ध 18 सप्टेंबर रोजी लाचखोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.
हे प्रकरण ताजे असताना बुधवारी 21 नोव्हेंबर रोजी 3 हजारांची लाच घेताना शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी मो. वसीयोद्दीन यांना एसीबीने चतुर्भूज केल्याने समाजमनातील पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे, असा ठपका ठेवत सदरील दोन्ही गुन्हे पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्या कमकुवत पर्यवेक्षनामुळे झाल्याने चंदेल यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली असून जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक मैराळ यांना शहर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment