अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमती होणार कमी

Friday, November 30, 2018

वर्षाअखेर सर्वसामान्यांना खुशखबर मिळाली आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडर स्वस्त झालं आहे. अनुदानित गॅस सिलेंडर 6.52 रुपये, तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 133 रुपयांनी स्वस्त झालंय. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

 विनाअनुदानित सिलेंडरचे दर एक हजार रुपयांच्या जवळ आले होते, पण या दर कपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुंबईत अनुदानित सिलेंडर कमी अधिक प्रमाणात 500 रुपयांच्या आसपास असेल, तर विनाअनुदानित सिलेंडर कमी अधिक प्रमाणात 800 रुपयांच्या आसपास असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे घसरलेले दर आणि डॉलरची तुलनेत रुपया मजबूत होत असल्यामुळे हे दर कमी झाले आहेत.

No comments:

Post a Comment