देशातील पहिला जलवाहतूक प्रकल्प राष्ट्राला समर्पित : मोदी

Monday, November 12, 2018

वाराणसी: राष्ट्रीय जल महामार्ग ही संकल्पना मी मांडली तेंव्हा माझी अनेकांनी चेष्टा केली पण आज देशात शंभर पेक्षा अधिक राष्ट्रीय जल महामार्गांचे काम सुरू आहे ,यामुळे विरोधकांची तोंडे बंद झाली असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .

देशातील पहिले मल्टी मोडल टर्मिनल देशाला समर्पित केल्यानंतर वाजिदपूर गावात आयोजित सभेत मोदी बोलत होते पंतप्रधान म्हणाले की गंगेचा पारंपारिक रस्ता आता आधुनिक सुविधानी युक्त होणार आहे यात निसर्ग ,संस्कृती पाहतानाच साहसाला संधी आहे यावेळी मोदी यांनी अडीच हजार कोटी रुपयांच्या योजनाचे लोकार्पण केले हे प्रकल्प वाराणसीला भव्य दिव्य बनवतील असे ते म्हणाले यात बाबतपूर विमानतळ शहराला जोडणे ,गंगा प्रादुर्भाव मुक्त करणे आदींचा समावेश आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच नद्यांचे मार्ग विस्तारले जात आहेत यात आपल्याला यश आले आहे या कामामुळे विरोधकांची तोंडे आता बंद झाली आहेत या योजनेतुन एकदा जेवढे साहित्य आले तेवढे आणण्यासाठी १६ ट्रक लागले असते जलवाहतुकीमुळे वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत झाली आहे असे सांगतानाच सरकारच्या विविध योजनांची माहिती मोदी यांनी दिली .

No comments:

Post a Comment