दुष्काळग्रस्त जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवा माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी

Tuesday, November 13, 2018


उस्मानाबाद: सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे .दुष्काळग्रस्त भागातील जनता संकटात सापडली आहे. या जनतेला पिण्याचे पाणी ,हाताला काम आणि जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने तातडीने नियोजन करून हे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत ,अशी मागणी माजी मंत्री ,आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.


उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रमुख अकरा मागण्या केल्या. यावेळी दिलेल्या निवेदनात ते म्हणाले की, यावर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात 42 टक्के पाऊस कमी झाला. यामुळे 2017 खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले .यामुळे शेतकरी संकटात सापडला .या जोडीला प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील 75 हजार शेतकरी पिक विम्या पासून वंचित राहिले. शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी .सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी. 

विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करावे .उस्मानाबाद जिल्ह्यातील परंतु इतर जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करून त्यांना मदत द्यावी. जनावरांसाठी आणि नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आवश्यक असेल तेथे चारा छावण्या सुरू कराव्यात. रोजगार हमीची कामे सुरू करावीत. पशु आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे थकीत बिल माफ करावे. कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन त्यासाठी केंद्र सरकारकडून सहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत घ्यावी. कालबद्ध नियोजन करून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा. सर्व केशरी कार्डधारकांना रेशन दुकानावरून धान्य द्यावे.

 दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टकडे असणाऱ्या शंभर कोटी रुपयांपैकी दहा कोटी रुपये मदत म्हणून द्यावेत आदी मागण्या आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना केल्या .या प्रश्नांसंदर्भात आपण आपण जनजागृती करणार असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात मागणी करणार असल्याचेही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment