पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिष विद्यावाचस्पती श्री विजयकुमार स्वामी यांनी आगामी ५ राज्याच्या निवडणुकी संदर्भात भविष्यवाणी वर्तवली` आहे ती आम्ही आपणासाठी देत आहोत .
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीकडे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहण्यात येत आहे. त्यातही मध्यप्रदेशची निवडणूक आणखी महत्त्वाची असेल. या राज्यात पंधरा वर्षे भाजपची सत्ता असून तेथे शिवराजसिंह चौहाण हे अत्यंत लोकप्रिय नेते आहेत.
आता या राज्यातील काँग्रेसचे आव्हान कसे आहे ते पाहु. कॉग्रेसने मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची नियुक्ती केली आहे. तर प्रचाराचे प्रमुख म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांना जबाबदारी दिली आहे. या राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंग यांनी सहा महिन्यांची नर्मदा परिक्रमा यात्रा काढली होती. परंतु त्यांच्यावर काँग्रेसचा भरवसा नाही. त्यामुळे त्यांना पक्षाच्या कार्यकारीणतही ठेवण्यात आलेले नाही. शिवाय राज्यात एकमुखी नेतृत्व नसल्याने काँग्रेसकडे मोठी ताकदच नाही. या राज्यातही केवळ नकारात्मक विचारावर निवडणूक जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांची ताकद खूप मोठी आहे. शिवाय त्यांना पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असून काही आरोप झाले असले तरी त्यांना पदावरून बाजूला करण्याची भाजपमधील कोणाचीही इच्छा नाही. कदाचित राष्ट्रीय नेतृत्वासाठी चव्हाण यांच्या नावाचीही पुढे चर्चा होऊ शकते. पण सध्या ते त्यांच्या राज्यातच खूश आहेत.
शिवराजसिंह चौहाण यांच्या पत्रिकेचा विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की, त्यांच्या पत्रिकेवर तनुस्थानातील शनि-चंद्र युतीचा मोठा प्रभाव आहे. तसेच दशमस्थानातील कन्या राशीचा राहु, पराक्रम स्थानातील रवी, षष्ठस्थानातील वृषभ राशीतील मंगळामुळे शत्रूवर कायम दबाव आणण्यात त्यांना यश मिळते. व्यस्थानातील वृश्चिक राशीतील गुरूमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका अर्थाने एक वैशिष्ट्य निर्माण झालेले आहे. व्यावहारिक फायदातोटा बाजूला ठेऊन निर्णय घेण्याची धमक असल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा चांगला भरवसा आहे. एखादा निर्णय चुकला तरी धाडसाने निर्णय घेतला तर तो भावी काळात उपयुक्त ठरतो. तसाच फायदा चव्हाण यांना होत आहे. शिवाय वर्षानुवर्षे लोकांशी थेट संपर्क असल्यामुळे चव्हाण हे मध्यप्रदेशच्या लोकांना आपल्यातील एक वाटतात. शिवाय कोणत्याही ठिकाणी मांडी घालून बसणारे आणि लोकांशी मोकळेपणाने चर्चा करणारे चौहाण यांच्या राशीतील ग्रहयोगही त्यांना अनुकूल आहेत. पत्रिकेतील चतुर्थस्थानातील मीन राशी बुध, शुक्र आणि केतू यांची युती असल्याने ती अशा जातकाला कायम सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवते. हे ग्रहयोग चव्हाण यांना सत्तेची हॅट्रीक पूर्ण केल्यानंतर सत्तेचा चौकार मारण्यास सिद्ध करीत आहे.
दुसरीकडे काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव जाहीर केलेले नाही. कमलनाथ यांचा बोलबाला करण्यात येत आहे. परंतु कमलनाथ हे राजघराण्यातील आहेत आणि त्यांनी त्यांच्या छिंदवाडा भागात मोठा विकासही केलेला आहे. ते सात वेळा लोकसभेवर निवडुन गेलेले आहेत. असे असले तरी जनमानसाशी त्यांचा फारसा संपर्क नाही. त्यामुळे त्यांच्या नावावर काँग्रेसला मतदान होईल ही शक्यता बरीच कमी आहे. दुसरे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे देखील लोकप्रिय असले तरी त्यांचाही एक परिसर ठरलेला आहे. ते राजघराण्यातील असल्याने त्यांच्या वागण्यामधील रुबाब आणि त्यांचे राहणीमान याचाही विपरीत परिणाम मतदारांवर होतो. शिवाय राहुल गांधी यांचा मध्यप्रदेशातील मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही. त्यामुळे याठिकाणी लढत चुरशीची दिसली तरी शिवराजसिंह चौहाण हेच पुन्हा भाजपला विजयाकडे नेतील असे आम्हाला वाटते.
राजस्थानातील चुरस :
राजस्थानचे एक वैशिष्ट्य म्हणजे गेली अनेक वर्षे येथे काँग्रेस आणि भाजप यांचे सरकार आलटून पालटून सत्तेवर आलेले आहे. मात्र 2013 च्या निवडणुकित काँग्रेसचा या ठिकाणी अत्यंत दारुण असा पराभव झालाल. भाजपला 163 तर काँग्रेसला फक्त 21 जागा मिळाल्या होत्या. त्या आधीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात कडवी लढत झाली होती. पण काँग्रेसला 200 पैकी 95 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपच्या जागांची संख्या 90च्या आसपास होती. नंतर बहुजन समाज पक्षाचे आमदार काँग्रेसमध्ये गेले होते. आता यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. पण वसुंधरा राजे यांचे सरकार काही प्रमाणात अप्रिय झाले असून पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने आता आम्ही सत्तेवर आलोच अशा प्रकारचे काँग्रेस नेत्यांचे एकूण वर्तन आहे.
आता वसुंधरा राज्यांच्या पत्रिकेचा विचार करू. त्यांच्या पत्रिकेत पंचम स्थानातील गुरू-शुक्र युतिचा प्रभाव आहे. पराक्रमात कुंभ राशीचा रवी आणि चतुर्थ स्थानात बुध-मंगळ युती यामुळे त्या कायम सत्तेच्या गोतावळ्यात राहु शकतात. त्यांच्या पत्रिकेत लाभ स्थानातील तुळ राशीत शनी-नेपच्यून युती तर अष्टमस्थानातील प्लुटो-केतू युती यामुळे त्यांचे राजकारणातील करीअर नेहमीच चढउताराचे ठरले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला कणखरपणा ही त्यांची मोठी शक्ती आहे. सप्तमस्थानात मिथून राशीतील हर्षलमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात हा कणखरपणा आलेला आहे. धनस्थानातील मकर राशीचा राहु आणि चतुर्थस्थानातील बुध-मंगळ यांची मीन राशीत युती असल्याने त्यांना त्यांच्या तरुण वयातच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यश प्राप्त झाले. 2003 मध्ये त्यांना मुख्यमंत्री पद प्राप्त झाले होते. परंतु राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती विचारात घेतली तर वातावरण त्यांच्या बरेचसे विरोधात आहे. कदाचित त्यांच्या सरकारचा पराभव देखील होऊ शकतो. अर्थात मतदार राजाच्या मनात काय आहे हे सांगणे सोपे नसते. पण पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार घोषित केल्याने आता सरकार परत सत्तेवर आणणे याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागेल. पण एकंदर कालखंड कठीण आहे. एवढे खरे. राजस्थानात कदाचित भाजपचा पराभव होऊ शकतो. परंतु त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी यांच्याच नेतृत्वावर राजस्थानातील जनता विश्वास व्यक्त करील असे वातावरण आहे.वसुंधरा राजे यांच्या तुलनेत अशोक गेहलोत यांचे ग्रहयोग चांगले असल्याने त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी लाभू शकते.
छत्तीसगड मध्येही चुरस :
मध्येप्रदेश प्रमाणेच छत्तीसगड या राज्यातही पुन्हा चुरस राहणार आहे. पण गेली पंधरा वर्षे रमणसिंग येथे राज्य करीत आहेत. मध्यप्रदेशचे विभाजन होऊन या राज्याची स्थापना झालेली आहे. छोट्या राज्यांचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला. छत्तीसगडमध्ये आदीवादी समाज मोठ्याप्रमाणात असून या समाजाचे एक नेते अजीत जोगी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र त्यांना अपघात झाल्याने ते काहीसे अपंग आहेत. परंतु निवडणूक रिंगणात ते कायम आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी वेगळा पक्ष काढला आहे. या राज्यात काँग्रेस आणि भाजप यांचे मतदान साधारण समसमान आहे. त्यामुळेच जर अजीत जोगी यांनी थोडीफार मते मिळवून काही जागा पदरात पाडुन घेतल्या तर ते किंगमेकर होऊ शकतात. पण त्यांच्या शक्तीचा सध्यातरी अंदाज करता येत नाही.
दुसरीकडे पंधरा वर्षे छत्तीसगडवर राज्य करून या राज्याला चांगल्या स्थितीत आणून ठेवणारे रमणसिंग यांची लोकप्रियता खूप मोठी आहे. त्यांनी राज्यातील मागासवर्गीय, आदिवासी आणि अन्य वंचित घटकांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सरकारी कल्याणकारी योजनांचा प्रभावी छत्तीसगड पॅटर्न रमणसींग यांनी निर्माण केला.
रमणसींग यांच्या पत्रिकेवर पराक्रम स्थानातील रवी-शनि आणि नेपच्यून युतीचा प्रभाव आहे. हे तीनही ग्रह कन्या राशीत आहेत. दुसरीकडे चतुर्थस्थानात स्वगृही शुक्र आणि बुध युती तर मंगळ षष्ठ स्थानात आहे. दशमस्थानातील मेष राशीत असलेला एकटा गुरू राजयोगामध्येही संन्यस्थ वृत्ती जोपासतो.राजसत्तेचा वापर व्यापक समाज हितासाठी करणे हे व्रत त्यामुळे जातक स्वीकारतो. त्यातच या गुरुवर शुक्र आणि बुधाची दृष्टी असल्याने त्याची सकारात्मक फळे मिळतात. आगामी निवडणूकीचा विचार करता रमणसिंग या राज्यात पुन्हा सत्तेवर येतील अशी अपेक्षा आहे.
छत्तीसगडचा विचार करताना माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना दुर्लक्षित करता येणार नाही. पुर्वीचे आयएएस असलेले जोगी एका जीवघेण्या अपघातात सापडले होते. त्यांच्या पायातील शक्ती नष्ट झाली असून ते आता व्हिलचेअरवर आहेत. असे असले तरी त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आहे. छत्तीसगड मधील आदिवासी समाजात त्यांचे मोठे स्थान आहे. जोगी यांनी सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या जाहिर सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याचा अर्थ जोगी हे राज्यातील निवडणूकीत महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. म्हणजे 90 सदस्यांच्या विधानसभेत 10 जागा मिळाल्या तरी ते किंगमेकर होऊ शकतात. भाजप आणि काँग्रेस या दोघांकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारची ऑफर येऊ शकते. म्हणजे कर्नाटकात 224 पैकी अवघ्या 38 म्हणजे सुमारे 15% जागा मिळवूनही कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊ शकतात तर त्याचप्रमाणात जागा मिळवून अजित जोगी हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. अर्थात त्यांची पत्रिका उपलब्ध नसल्याने त्याबाबत गणित मांडता येत नाही. पण अजित जोगी यांच्या मागे जनमत जाऊ लागले तर एक दोन टक्के मते काँग्रेसच्या पारड्यातून कमी होऊन ती जोगी यांच्याकडे जाऊ शकतात. असे झाले तर काँग्रेसच्या जागा झपाट्याने कमी होऊन पुन्हा एकदा रमणसिंग यांनाच कौल मिळू शकतो. दुसरे म्हणजे राजकिय पक्षाला पराभूत करण्याचे काम विरोधी पक्ष करू शकतो तसेच स्वपक्षिय देखील करू शकतात. जर रमणसिंग यांना हरवायचे असेल तर पक्षातूनच पर्यायी नेतृत्व उभे राहायला हवे. पण तसे अन्य नेतृत्व छत्तीसगड मध्ये भाजपकडे नाही. त्यामुळेच रमणसिंग यांना आज तरी अनुकुल असे वातावरण आहे.
तेलंगण :
तेलंगण राष्ट्रीयसमिती, भाजपा व काँग्रेस, तेलगू देसम यांची आघाडी अशी तिरंगी लढत होईल. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांनी विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतल्याने मुदतपूर्व निवडणूक होत असुन त्यांचे ग्रहयोग पाहता त्यांचा वरचष्मा राहणार आहे. ना तिथे भाजपाला सत्ता मिळेल ना काँग्रेसला. निवडणूकीनंतर राव हेच सत्ताकेंद्री असतील. हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांना बहुमत प्राप्तीसाठी ते दोघापैकी कोणाचीही मदत घेतील. (काँग्रेस किंवा भाजपा)
मिझोराम :
19-5-1942ला जन्मलेले विद्यमान मुख्यमंत्री लाल ठाणहावला यांचे ग्रहयोग पाहता ह्यावेळेस त्यांना ही निवडणूक सोपी नसून सत्तेसाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल व काही फरकाने सत्ता जाऊ शकते.
विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी mobile no ८०००७८७८१४४

No comments:
Post a Comment