मला मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना

Monday, October 8, 2018

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनतर आज पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आपल्या वकिलाने कोणत्याही चॅनेलशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मी दहा वर्षांपूर्वीही स्पष्टीकरण दिलं होतं. 10 वर्षापूर्वी जे बोललो होतो तेच खरं आहे. त्यात आज काय बदल होणार आहे? असा सवालही नाना पाटेकरांनी विचारला आहे. माझ्या वकिलाने मला कोणत्याही चॅनेलशी बोलण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मी आता यावर काही बोलू इच्छित नाही. नाहीतर चार दिवस अगोदरच मी बोललो असतो. वेळ आल्यावर मी सगळ्यांशी एकत्र बोलेन, असंही नाना पाटेकरांनी स्पष्ट केलं आहे.

जे बोलायचं ते मी 10 वर्षांपूर्वीच बोललो आहे असे नानांनी स्पष्ट शब्दात सांगितले. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केले आहेत. नानांनी याआधीच तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आज नाना पत्रकार परिषद घेणार होतो. मात्र त्यांचा मुलगा मल्हारने ही पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर घराबाहेर जामलेल्या पत्रकारांशी नाना येऊन बोलले, ‘तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही असे नानांनी स्पष्ट केले. दरम्यान तनुश्रीने देखील शनिवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यात नाना पाटेकर यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील उल्लेख आहे

No comments:

Post a Comment