कदमांनी माफी मागितली, विषय संपला

Friday, September 7, 2018

मुंबई : बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप आमदार राम कदम यांची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली आहे. "राम कदमांनी माफी मागितली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा", असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. त्यामुळे कदमांवर भाजपकारवाई करणार नसल्याचे संकेत मिळत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

दरम्यान, पाटील यांनी कदम यांच्या निमित्ताने इतर लोकप्रतिनिधींना जपून बोलण्याचा सल्ला दिला. 'लोकप्रतिनिधींनी बोलताना काळजी घ्यायला हवी. तर एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय होतो हे दाखवताना माध्यमांनीही काळजी घ्यायला हवी', असंही त्यांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कदम यांची पाठराखण केली.  'कदम महिलांना नेहमीच मदत करतात. त्यामुळे त्यांना हजारो महिला राखी बांधतात. एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय होता? जरी चुकीचा अर्थ निघत असला तरी त्यांनी माफी मागितल्यावर हा विषय संपवायला हवा. आमच्यासाठी तरी हा विषय आता संपलेला आहे', असंही ते म्हणाले. मात्र कदम यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच घेतील, असं सांगत पाटील यांनी हातवर केले. 

No comments:

Post a Comment