लातूर :दुष्काळ मुक्तीसाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने किल्लारी येथे रविवार दि .३० सप्टेंबर रोजी निर्धार समारंभ आयोजित करण्यात आला आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शरद पवार ,शिवराज पाटील चाकुरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे .
भारतीय जैन संघटनेच्या वतीने शांतीलाल मुथा यांनी पुढाकार घेवून हा कार्यक्रम आयोजित केला आहे .लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात भुकंप झाला .त्यानंतर मुथा यांनी या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. अनाथ मुलांना शिकवले. भुकंपाला इष्टापत्ती मानत मोठे काम त्यानी उभे केले .आताही लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कायमची दूर करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत जलपुनर्भरण ,नाला सरळीकरण यासारखी कामे करून शिवार जलयुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे .संघटनेच्या माध्यमातून या कामासाठी यंत्रसामुग्री दिली जाणार आहे .पंचवीस वर्षांपूर्वी भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या किल्लारी येथे हा निर्धार समारंभ होणार आहे . रविवारी दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस ,शरद पवार आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, टाटा ट्रस्टचे विश्वस्त अमित चंद्रा ,बीजेएसचे वल्लभ भन्साळी , खासदार सुनील गायकवाड, खासदार रवींद्र गायकवाड ,माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ,पद्मसिंह पाटील ,राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मधुकरराव चव्हाण ,आ.अमित देशमुख, आ. बसवराज पाटील ,माजी मंत्री दिलीपराव देशमुख, ज्ञानराज चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुष्काळापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी परिसरातील गावांचे सरपंच, चेअरमन, ग्रामस्थ आणि नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुष्काळमुक्तीचा संकल्प करावा असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment