मंगलमूर्तीची आरती
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ॥
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ॥
कंठी झळके माळ मुक्ताङ्गळांची ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥
दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥
रत्नखचित ङ्गरा तुज गौरीकुमरा ॥
चंदनाची उटी कुंकुमकेशरा॥
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा॥
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया॥ २॥
लंबोदर पितांबर ङ्गणिवरबंधना ॥
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ॥
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥ दर्शन ॥
****
गणराजाची आरती
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ॥
दोंदिल लाल बिराज सुत गौरी हरको॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ॥
महिमा कहे न जाय लागत हुं पदको ॥
जय जय जी गणराज विद्याुसखदाता ॥
धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ॥
अष्टौसिद्धी दासी संकटको बैरी ॥
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ॥
कोटी सुरजप्रकाश ऐसी छब तेरी॥
गंडस्थळ-मदमस्तक झुले शशिबिहारी ॥
भावभगतसे कोई शरणागत आवे ॥
संपत संपत सबही भरपूर पावे ॥
एैसे तुम महाराज मोको अति भावे ॥
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥
****
मंगलमूर्तीची आरती
नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें॥
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे ॥
ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे॥
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती॥
तुझ गुण वर्णाया मज कैंची स्ङ्गुर्ती ॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ॥
त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ॥
सर्वही पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव०॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी ॥
कीर्ति तयांची राहेजोवर शशितरणी ॥
त्रैलोक्यी ते विजयी अद्भूत हे करणी ॥
गोसावीनंदन रत नामस्मरणी॥
जय देव जय देव जय ॥
****
मोरयाची आरती
गजानन श्री गणराया | आधी वंदू तुज मोरया |
मंगलमुर्ती श्री गणराया | आधी वंदू तुज मोरया ॥
सिंदुरचर्चित धवळे अंग | चंदन उटी खुलवी रंग |
बघता मानस होते दंग | जीव जडला चरणी तुझीया ॥
गौरी तनया भालचंद्रा | देवा कृपेच्या तु समुद्रा ॥
वरदनिवनायककरुणागारा | अवघी विघ्ने नेसी विलया ॥
****
गणपतीबाप्पाची आरती
तु सुखकर्ता तू दु:ख हर्ता विघ्यविनाशक मोरया॥
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥
मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धीविनायक |
तुझिया दरी आज पातलो, देईचित्त मज ध्याया ॥
तूं सकलांचा भाग्यविधा, तू विद्येचा स्वामी दाता|
ज्ञानदीप उजळून आमुचा, निमवी नैराश्याला ॥
तूं माता, तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या ॥
पामर मी वर उणे भासती, तुझी आरती गाया॥
मंगलमूर्ती मोरया॥ गणपतीबाप्पा मोरया ॥
****
विघ्नहर्त्याची आरती
उंदिरावरी बैसोनी दुडादुडा येसी ॥
हाती मोदक लाडू घेऊनिया खासी॥
भक्तांचे संकटी धावुनि पावसी ॥
दास विनवीती तुडिया चरणांसी ॥
जय देव जय देव जय जय गणराजा॥
सकळ देवाआधी तू देव माझा ॥ जय देव॥
भाद्रपदमासी होसी तू भोळा ॥
आरक्त पुष्पांच्या घालुनिया माळा ॥
कपाळी लावूनि कस्तुरी टिळा ॥
तेणे तू दिससी सुंदर सावला ॥
प्रदोषाचे दिवशी चंद्र शापीला ॥
समयी ठेवे मोठा आकांत केला ॥
इंदु येवोनी चरणी लागला ॥
श्रीरामा बहुत शाप दीधला ॥
पार्वतीच्या सूता तु ये गणनाथा॥
नेत्र शिणले तुझी वाट पाहता ॥
किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ॥
मजला बुद्धि देई तू गणनाथा ॥
****
मोरेश्वराची आरती
वेदशास्त्रांमाजी तू मंगलमूर्ती ॥
अगणित महिमा तुझा कल्याणस्ङ्गूर्ती ॥
भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती ॥
मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती॥
जय देव जय देव जय मोरेश्वरा॥
तुझा नकळे पार रेषा ङ्गणिवरा ॥
पुळ्यामध्ये नांदे महागणपती॥
माघचतुर्थीला जन यात्रे येती ॥
जें जे इच्छिति ते ते सर्वही पावती॥
गणराजा मज बाळा द्यावी अभिमती ॥ जय॥
एकविस दूर्वांकुरां नित्य नेमेंसी ॥
आणुनि जे अर्पिती गणराजयांसी ॥
त्यांचे तू भावबंधन देवा चुकवीसी ॥
विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणांसी॥
****
गणपतीची आरती
जय देव जय देव जय वक्रतुंडा |
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥ जय॥
प्रसन्नभाळा विमला करि घेऊनि कमळा ॥
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला |
रुणझुण करिती घागरिया घोळा |
सतार सुस्वर गायन शोभित अवलीया ॥
सारीगमपधनीसा सप्तस्वरभेदा |
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक् तातक् थैय्या करिसी आनंदा ॥
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय ॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना |
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना
ऊर्ध्वेदोंदलि उंदिर कार्तिकेश्वर रचना ॥
मुक्तेश्वर चरणाबुंजि अलिपरि करि भ्रमणा ॥
जय देव जय देव जय ॥
****
गणपतीची आरती
एकदंता गुणवंता गौरी सुखसदना |
ऋद्धिसिद्धिदायक कलिकिल्मषदहना ॥
उन्नत गड स्त्रवती डुलती नग नाना |
शुंडादंडे मंडित गंभीर गजवदना॥
जय देव जय देव जय शंकरकुमरा |
पंचप्राणे आरती उजळू तुज चतुरा ॥ जय॥
अंबुजनेत्री बुब्बुलभ्रमर भ्रमताती |
भारेंसुरवर पुजा देवा तुझि करिती॥
लाडुधर वरदका मुनिजन गुण गाता |
कर्णी कुंडले देखुनि रविशशि लपताती ॥
चरणी नुपुरांची रुणझुणध्वनि उठली ॥
एकविस स्वर्गी भेदुन तद्रुपी संचरली ॥
अनंत अंडे ज्यांच्या घोषे दुमदुमली
अद्भूत पंचभूते तेथूनि उद्भवली ॥
ऐसे वैभव तुझे नाटक नृत्याचे |
देखुनिया लुब्धले मन गंधर्वाचे |
ऐकुनि चिंतन करणे तुझिया चरणाचे |
चिंतन करिता नासे दु:ख विश्वाचे ॥
कमलासन भयनाशन गिरिजानंदना ॥
कटि सुंदर पीतांबर ङ्गणिवर भूषणा ॥
विद्यावर गदि तोडर अमरारीमथना ॥
मनरंजन रहिमंडण गणपती गुरु जाणा ॥
जय देव जय देव शंकर ॥
****
गणपतीची आरती
आरती मी करीन तुला श्रीगजानना |
वक्रतुंड एकदंत मुषक वाहना॥
त्रिविधताप दूर करी गौरीनंदना ॥
दैनय हरुनि तारी मला विघ्ननाशना॥
भक्तसखा तुची एक सिंदुरानना |
मी निशिदिनी ध्यातो तुला दुष्ट भंजना ॥
पंचारति ओवाळिन पुरवी कामना ॥
साह्य करी निशिदिनि मज भक्ततारणा ॥
भाविक जन पूजिति तुला स्वहित साधना ॥
वासुदेव लीन पदीं धुरुनि धारणा॥

No comments:
Post a Comment