लॉस एंजेलिस: अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांचा साखरपुडा नुकताच मुंबईत पार पडला. गेल्या महिन्यात 18 तारखेला मुंबईत प्रियांका-निकची एन्गेजमेंट पार्टी झाली.
निकची एक्स-गर्लफ्रेंड ओलिविया कल्पोने प्रियांका-निकच्या एन्गेजमेंटनंतर आनंद व्यक्त केला आहे. ओलिविया कल्पो ही 2012 मध्ये मिस युनिव्हर्स होती. तिने एक्स बॉयफ्रेण्ड निकला शुभेच्छा दिल्या
प्रियांका आणि निक जोनस हे गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र निकची यापूर्वी अनेक अफेयर्स होती. निकने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. त्यापैकीच एका एक्स गर्लफ्रेंडने पहिल्यांदाच निकच्या साखरपुड्याबाबत मौन सोडलं आहे.निक आणि कल्पो यांचं 2015 मध्ये ब्रेकअप झालं होतं. कल्पो सध्या डॅनी अमेंडोलाला डेट करत आहे. डॅनी अमेंडोला हा मियामी डॉल्फिन फुटबॉल क्लबकडून खेळतो.
कल्पो म्हणाली, “मला वाटतं कोणत्याही वेळी, कोणीही आपलं प्रेम मिळवू शकतं. निक-प्रियांकाच्या एन्गेंजमेंटने मी आनंदी आहे. प्रत्येकाला प्रेम आणि आनंद मिळावा”

No comments:
Post a Comment