लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीमधील सोळा सदस्यांपैकी आठ सदस्य शुक्रवारी झालेल्या सभेत निवृत्त झाले . चिठ्ठी काढून निवृत्त होणाऱ्या सभासदांची नावे जाहीर करण्यात आली. निवृत्त होणाऱ्यामध्ये सत्ताधारी भाजपाचे 4 ,काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादीच्या एकमेव सदस्यांचा समावेश आहे.
स्थायी समितीमध्ये सदस्य निवृत्त होणे आणि नव्या सदस्यांची निवड हा कार्यक्रम यापूर्वीच पार पडला होता .परंतु प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ही प्रक्रिया नव्याने करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेत आज शुक्रवारी सभा पार पडली. या सभेत चिठ्ठ्या टाकून निवृत्त होणाऱ्या सभासदांची नावे जाहीर करण्यात आली. मागच्या सभेत शैलेश गोजमगुंडे यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली होती. ते देखील या बैठकीत चिट्ठीद्वारे द्वारे निवृत्त झाले. गोजमगुंडे यांच्यासह भाजपाचे संगीत रंदाळे ,शैलेश स्वामी,सौ . शीतल मालू , काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे, पप्पू देशमुख ,अहमद खान पठाण तर राष्ट्रवादीचे राजा मनियार यांचा निवृत्त होणाऱ्या मध्ये समावेश आहे .
मागच्या खेपेला सभापती अशोक गोविंदपूरकर हे चिठ्ठीद्वारे निवृत्त झाले होते त्यामुळे नविन सदस्याची सभापतीपदी निवड करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया रद्द ठरल्याने गोविंदपूरकर यांचा फायदा झाला उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात भाजपाचे शैलेश गोजमगुंडे सर्वोच्च न्यायालयात गेलेले असून तेथे या प्रकरणाचा काय निकाल लागतो त्यावर आजची प्रक्रिया आणि निवृत्त झालेल्या सदस्यां चे भवितव्य ठरणार आहे
.

No comments:
Post a Comment