नवी दिल्ली आयकर विभागाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठविली होती. उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, आज न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावले असून आयकर विभाग कधीही जुन्या प्रकरणांची चौकशी करू शकत असल्याचे स्पष्ट केले आहे.
याचिकाकर्त्यांनी आपल्या तक्रारीबाबत आयकर विभागाशी संपर्क करायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंद पुकारला होता. नेमके त्याचवेळी न्यायालयाचा हा निकाल आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजपाने पलटवार करत काँग्रेस हा भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष असल्याची टीका केली आहे. न्या. एस रवींद्र भट आणि न्या. ए के चावला यांच्या खंडपीठाने काँग्रेसने नेते ऑस्कर फर्नांडिस यांचीही याचिका फेटाळली. त्यांनी २०११-१२ मध्ये आपल्या कर निर्धारणाची फाइल पुन्हा एकदा उघडण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

No comments:
Post a Comment