सामान्यांची पत वाढविण्याचे काम विलास को-ऑपेटिव्ह बॅंक करेल अमित विलासराव देशमुख

Tuesday, September 25, 2018

लातूर प्रतिनिधी:
सामान्य माणूस व्यवसायीक, उद्योजक बनला पाहिजे त्यांच्या शेतीचे आधुनिकीकरण झाले पाहिजे यातून त्‍यांची आर्थिक आणि सामाजिक पत वाढायला हवी. या दृष्टीने विलास को.ऑपरेटिव्ह बॅकेची भविष्यातील वाटचाल राहील अशी ग्वाही माजी राज्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. विलास को.ऑपरेटिव्ह बॅकेची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मार्केट यार्ड येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्‍या अध्यक्षतेखाली सोमवार रोजी पार पडली. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर महानगरपालिकेचे सदस्य अशोक गोविंदपूरकर, उ.कृ.उ.बा.समितीचे सभापती ललितभाई शहा, लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख, ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲड.विक्रम हिप्परकर, ट्वेन्टीवन शुगर्स लि. चे समन्वयक विजय देशमुख, उ.कृ.उ.बा.समितीचे उपसभापती मनोज पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, संचालक सुर्यकांत कातळे, डॉ.अशोक पोतदार, डॉ. जयदेवी कोळगे, पंडीत कावळे, प्रविण घोटाळे, सुरेश धानुरे, सौ.ख्वाजाबाणू अन्सारी, ॲड.किरण जाधव, नेताजी बादाडे, अरुण कामदार, सुनिल पडीले, व्यंकटेश पुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी के.जी.गहीरवाल यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलतांना आमदार देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा घेवून स्थापन झालेल्या या बॅकेतून त्याचा उददेश सफल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. पूढेही ते होत राहणार आहेत. राष्ट्रीय बॅकेत ज्यांना सहकार्य मिळत नाही अश्या सर्व स्तरातील माणसांना स्वालंबी, यशस्वी उद्योजक, व्यापारी बनविण्याचे काम विकास बॅकेतून होत आहे. ग्राहकांची पत पाहून नव्हे तर त्यांचे कर्तत्व आणि होतकरूपणा पाहून ही बॅक कर्ज देणार आहे. कमीत कमी वेळेत व कमीत कमी कागदपत्र पाहून कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुचना आपण संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या सवलत देवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम बॅक करणार आहे. सर्व प्रकारच्या अदययावत सोयी सुविधा देवून बॅकेचा विस्तार वाढविण्यात येणार आहे.



महिलांना उदयोजक बनविणार

महिलांच्या अंगी असणारा प्रमाणिकपणा अधिकचे काम करण्याची तयारी आणि त्यांची जिदद लंक्षात घेवून त्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देवून महिला उदयोजक बनविण्यासाठी बॅक पुढाकार घेणार असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, अहवाल वाचन उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांनी केले. यावेळी अशोक गोविंदपूरकर, ललितभाई शहा व ॲड.विक्रम हिप्परकर यांनी बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. यावेळी विषय पत्रिका वरील सर्व विषयांचे वाचान मुख्य कार्यकारी अधिकारी के.जी.गहीरवाल यांनी केले. टाळहयांच्या गजरात सर्व सभासदांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे संचालक ॲड.किरण जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment