शिबीरात 130 रक्तदात्यांचे रक्तदान

Sunday, September 16, 2018


हिंगोली / प्रतिनिधी 
येथील नवा मोंढा भागातील श्रीराम बाल गणेश मंडळाच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणरायाची पुजा करून रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन करण्यात आले. या शिबीरात 130 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

     मागील काही दिवसांपासुन शासकीय रक्तपेढीत रक्तदाचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना रक्तासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर नवा मोंढा भागातील श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, जि.प.सदस्य ऍड.गयबाराव नाईक, अशोक चव्हाण, गोपालदास तापडीया यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबीरात 130 रक्तदात्यांनी रक्तदान केेले. यशस्वीतेसाठी गोपाल दुबे, ललित अग्रवाल, आशिष काबरा, केशव दुबे, ऍड. निलेश तापडीया, ओमप्रकाश सारडा, निलेश बडजाते, शंकर अग्रवाल, विशाल बडजाते, सागर तापडीया, दिनेश गोलेच्छा, अजय सारडा, अर्पित दुबे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment