नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पुन्हा एकदा काश्मीरबाबतची भूमिका व्यक्त केली "न गाली से, न गोली से, हर एक कश्मीरी को गले लगाने से समस्या सुलझने वाली है। न गाली से, न गोली से...परिवर्तन होगा गले लगाने से।' असे म्हणत मोदींनी काश्मीरचा प्रश्न प्रेमानेच संपेल असे सांगितले. जम्मू काश्मीरचा विकास आणि प्रगती देशावासियांचा संकल्प आहे. त्यामुळे काश्मीच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असून पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरचे स्थान अबाधित ठेवणार असल्याचे मोदींनी म्हटले. काश्मीरमध्ये ज्या काही अनुचित घटना घडत आहेत, काही फुटीरतावाद्यांकडून तेथे वातावरण खराब करण्यात येत आहे.
. मात्र, दहशतवादाबाबत कुठलिही संयमी भूमिका भारत घेणार नाही. काही मुठभर फुटीरतावादी काश्मीरचे वातावरण खराब करत असल्याचेही मोदींनी या भाषणात सांगितले.
No comments:
Post a Comment