राहुल गांधी चे नेतृत्व मान्य नाही : शरद पवार

Sunday, June 24, 2018
मुंबई दि  २४ प्रतिनिधी 
देशात भाजप ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात महाआघाडी ची स्थापणा करण्या च्या हालचाली चालू आहेत त्या दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यानी एका खासगी वृत्त वाहिनी ला मुलाखतीत म्हणाले की देशात महा आघाडीची शक्यता नाही या सोबत ते हे पण म्हणाले की राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसल्या चे ते म्हणाले या त्याच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आहे कारण शरद पवार यांचे सर्वच पक्षासोबत चांगले संबध आहेत पवार यांच्या शब्दाला किम्मत आहे असे वक्तव्य करुण शरद पवार यानि पुन्हा खळबळ उडून दिली आहे तय मुले पवार यांच्या मनात नेमके काय शिजतय या बाबत तर्क वितर्क लावले जात आहेत
 निवडणूकीनंतर चेहेरा कोण असेल ते बघू
महाआघाडीचं नेतृत्व कुणी करावं हा सध्या प्रश्नच नाही. निवडणूकीनंतर कुठल्या पक्षाला किती जागा मिळातात ते बघावं लागेल. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळं आत्ताच कुणाचं नाव कशासाठी घ्यायचं? निवडणूकीनंतर चेहेरा कोण असेल ते बघू. निवडणूकीनंतर सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असे स्पष्टीकरण देण्याऱ्या शरद पवार यानी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीवरजोरदार टिकास्त्र सोडले आहे भाजप हा दहा मुखी रावण असल्याचे ते म्हणाले आहेत
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment