लातूर/प्रतिनिधी ः जिल्हा पाणीदार करून दुष्काळाचा लागलेला कलंक धुवून काढण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून दि. २५ मे ते ५ जून या दरम्यान लातूर शहरासह जिल्ह्यात स्वावलंबन यात्रा काढण्यात आलेली आहे. ही स्वावलंबन यात्रा आज लातूर शहरातील प्रभाग क्र. २ व ३ मध्ये काढण्यात आली. या यात्रेदरम्यान पंचनिष्ठांसाठी करण्यात येणार्या श्रमदानाला औसा येथील नाथ संस्थांनचे गुरुबाबा महाराज यांनीही योगदान देत इंद्रप्रस्थ अभियानास आध्यात्माची जोड दिलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी पंचनिष्ठांसाठी श्रमदान करून जिल्हा पाणीदार करावा, असे आवाहन करून गुरुबाबा महाराज यांनी आध्यात्मिक कार्यक्रमांतूनही हा संदेश पोहचविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतर्ंगत लातूर शहरातील प्रभाग क्र. २ व ३ मध्ये स्वावलंबन यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, गुरुबाबा महाराज, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक मंगेश बिराजदार, मंडलप्रमुख रवी सुडे यांच्यासह नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शहरातील विवेकानंद चौकातील स्वामी विवेकानंद यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या यात्रेची सुरूवात केल्यानंतर विवेकानंद चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याच बरोबर शाहू नगर येथील ग्रीन बेल्टमध्ये शोषखड्डा व बोअर पुर्नभरण, गोरोबा काका मंदीर परिसरात वृक्षारोपण, एक्बाल चौक येथे बोअर पुर्नभरण, अराफत चौक येथे वृक्षारोपण, विवेकानंद चौकात असलेल्या हनुमान मंदीर येथे शोषखड्डा यासाठी श्रमदान करण्यात आले. या यात्रेदरम्यान पालकमंत्री निलंगेकर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना वृक्ष दिले. या वृक्षाचे संगोपन करून आपला परिसर हरीत बनवावा, असे आवाहन करून पालकमंत्री निलंंगेकरांनी पाण्याचा प्रत्येक थेंब न थेब जमिनीत मुरवून आपले आवारही जलयुक्त करावे, असे सांगितले.
या स्वावलंबन यात्रेत औसा येथील नाथसंस्थानचे गुरुबाबा महाराज यांनीही सहभाग नोंदविला होता. महाराजांनी पालकमंंत्री निलंगेकर यांच्या समवेत पंचनिष्ठांसाठी श्रमदान या अभियानास आध्यात्माची जोड दिली. असलेल्या पाण्याचा योग्य वापर करून पावसासह सांडण्याचे संचय केल्यास हे अभियान भावी पिढीसाठी महत्वाचे ठरेल, असे सांगितले.
दोन वर्षापूर्वी लातूर शहरासह जिल्ह्याला भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागले होते, याची आठवण करून देत नागरिकांनी स्वहितासाठी या अभियानात सहभाग नोंदवून पंचनिष्ठांसाठी श्रमदान करावे, असे आवाहन केले. पालकमंत्री निलंगेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारे हे अभियान केवळ राज्यासाठीच सव्हे तर देशासाठी आदर्शदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करून प्रत्येक आध्यात्मिक कार्यक्रमात या अभियानाचे महत्व पटवून देण्यासाठी आध्यात्मिक परिवाराचे योगदान राहील, अशी ग्वाही दिली.
पालकमंत्री निलंगेकरांनी कोणताही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता सुरू केलेले हे अभियान हिट होण्यासाठी नव्हे तर जिल्ह्याला फीट ठेवण्यासाठी सुरु केले आहे. असे सांगून सर्वच क्षेत्रातील लोकांना या अभियानाला आपले अभियान समजून योगदान द्यावे, असे आवाहनही केले.
प्रभाग २ व ३ मध्ये काढलेल्या या यात्रेचा समारोप विवेकानंद चौकात पालकमंत्री निलंगेकरांनी नागरिकांशी संवाद साधून केला. यावेळी प्रभागासह शहरातील नगरसेवक, पक्षपदाधिकारी व वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांनी मोठा सहभागी नोंदविला.

No comments:
Post a Comment