Sunday, May 20, 2018May 20, 2018
मुंबई : मराठी बिग बॉस कार्यक्रमातून अभिनेता राजेश शृंगारपुरेला बाहेरचा रस्ता धरावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या भागातच राजेशला बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. अनिल थत्ते बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर, राजेश शृंगारपुरे सध्या बिग बॉसमधील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. कारण रेशम टिपणीस सोबतचे त्याचे काही प्रसंग चर्चेत आहेत. असे सारे असताना, राजेशच बिग बॉसमधून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये काहीशी संभ्रमाची अन् उत्सुकतेची भावना आहे. त्यामुळे आजच्या भागाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार?
By Marathwada Neta
Sunday, May 20, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment