नांदेड लातूररोड व्हाया लोहा अहमदपूर प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती द्या

Saturday, September 29, 2018


नांदेड दि.
प्रस्तावित नांदेड लातूररोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर या रेल्वे मार्गाला गती द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने दक्षिण मध्ये रेल्वे च्या महाव्यवस्थापकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड बीदर या नविन रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली होती.दरम्यान नांदेड- लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर असा मार्ग मंजुरी साठी या भागात विविध पक्ष संघटनेच्या वतीने मोठे अंदोलन झाले.या नंतर या मार्गाच्या सर्व्हेक्षणास मंजुरी देण्यात येवून निधीची मंजूर करण्यात आला.या कामाला साधारणतः 2035 कोटी खर्चाचे अंदाज पत्रक करण्यात आले.मात्र या पूढे गेल्या कांही महिन्यापासून रेल्वेकडून कसलीच कार्यवाही होत नाही.

आज दक्षिण मध्ये रेल्वेचे महिव्यवस्थापक यादव साहेब हे नांदेड येथे या भागातील खासदारांसोबत रेल्वेच्या प्रश्ना बाबत चर्चा करणार असल्याने रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने भेट घेवून या कामास गती देण्याची मागणी केली.हा मार्ग इतर मार्गाच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.व्यापार उद्योग धंदे वाढण्यासाठी रेल्वे मार्गाची खूप गरज असून या भागातील मागासलेपणाचा कलंक पूसून टाकण्यासाठी या रेल्वे मार्गाची महत्वाची भूमिका असनार आहे.हा रेल्वे मार्ग झाल्याने तिरूपती,पंढरपूर,तूळजापूर,औंढा नागनाथ आदी तीर्थ क्षेत्र रेल्वे मार्गाने एकमेकांस जोडला जाणार आहे.या भागात शेतक-यांनी पिकविलेल्या शेती मालास मोठी बाजारपेठ मिळून शेतक-यांच्या जीवनात आर्थीक क्रांती घडविनारा मार्ग आहे. 

या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण,जीवन गायकवाड, अॅड.सूभाषराव सोनकांबळे, आकार सांगविकर,अजय भालेराव,पठाण मोहम्मद,अर्जून वाघमारे,शेख नूरमोहम्मद,सैय्यद नौशाद,पठाण शहारूख,शेख इम्रान,प्रदीप कांबळे आदिंची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment