पगारासाठी जाळून घेणाऱ्या मार्केटिंग एजंटचा मृत्यू

Thursday, January 10, 2019


नांदेड :- जुना मोंढा भागातील फ्रेंड्स जर्दा दुकानासमोर ३१ डिसेंबर रोजी पगाराच्या पैशासाठी जाळून घेणाऱ्या हिदायत युनूस शादुलकर (३८) याचा बुधवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. 

हिदायत फ्रेंड्स जर्दा दुकानात एनर्जी ड्रिंकचे मार्केटिंगचे काम करीत होता. दुकान मालक सलीम सौदागरने त्याचा एक वर्षाचा अडीच लाख रुपये पगार थकवला होता. तो पगारासाठी अनेक दिवस विनवणी करीत होता. 

परंतु मालकाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मानसिक तणाव वाढल्याने हिदायतने दुकानासमोरच स्वत:ला जाळून घेतले. यात तो गंभीररीत्या भाजला गेला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तो मरण पावला.

No comments:

Post a Comment