Thursday, January 10, 2019January 10, 2019
लातूर – येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पुर्ण ब्रम्हयोगिनी त्यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गरजू कुटूंबपुमुखांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सोमवार, दि. 7 जानेवारी 2019 रोजी लातूर तालुक्यातील चिंचोली ब. येथे आयोजित कार्याक्रमात आरोग्य सुरक्षा कार्डांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार विनायकराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव, कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिपचे अध्यक्ष मिलींद लातूरे, गंगाखेड शुगर मिल्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिप बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार, प्रशासकीय व शिक्षण संचालिका डॉ. सरिता मंत्री, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, गरीबापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्याचे मोठे काम रमेशअप्पा कराड यांनी प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून हाती घेतले आहे. हजारो कुटूंबांना दत्तक घेवून गरजूंवर मोफत विलाज करण्यात येत असल्यामुळे हे कार्य कौतुकास्पद आहे. या भागातील गरीब व वंचितांना या योजनेमुळे आरोग्याच्या बाबतीत दिलासा मिळाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, आपल्या कुटूंबातील सदस्याला एखादा आजार झाल्यास ते कुटूंब आजारावरील खर्चाने मोडीत निघते. आपल्यावर आरोग्याचे कोणतेही संकट येवू नये असे प्रत्येकाला वाटते मात्र आजार झाल्यास उपचार घेणेही आवश्यक असते. रमेशअप्पा कराड यांनी गरीबांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी तब्बल 50 हजार कुटूंबांना दत्तक घेणे विशेष आहे. महाराष्ट्रात आपजर्यंत एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेसाठी कुटूंबाना कोणीही दत्तक घेतलेला नसून हा एक चांगला उपक्रम आहे. 60 वर्ष कॉग्रेसचे पुढारी सत्तेवर राहिले मात्र त्यांनी एकाही माणसावर आरोग्यासाठी खर्च केला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रमेशअप्पा कराड म्हणाले, गेल्या 25 वर्षात वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना अनेक गरजू रुग्णांना आरोग्य सेवेसाठी मदत करता आली याचे समाधान आहे. सध्याच्या भिषण दुष्काळात शेतकऱ्यांना व गरजू रुग्णांना आरोग्याच्या बाबतीत आधार देण्यासाठी त्यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत 50 हजार कुटूंबांना दत्तक घेण्यात आले आहे. दत्तक कुटूंबातील रुग्णांवर यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येणार असून शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभही सबंधीत रुग्णांना मिळवून देण्यात येणार असल्याने त्यांनी सांगीतले.
या कार्यक्रमास चिंचोली ब. व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
गरजू कुटूंबप्रमुखांना ना. पंकजाताई मुंडे, ना. संभाजीराव पाटील यांच्या हस्ते आरोग्य सुरक्षा कार्डांचे वाटप

By Marathwada Neta
Thursday, January 10, 2019

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment