23 मार्चपासून IPL सुरु होणार?

Wednesday, January 9, 2019


मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलच्या 12व्या हंगामावर सुरु असलेल्या चर्चेवर मंगळवारी पूर्णविराम लागला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक समितीने आयपीएल 2019 भारतात खेळवण्यात जाईल असा निर्णय घेतला आहे. यापूर्वी असे समजले जात होते की, भारतात निवडणूक सुरु होणार असल्यामुळे आयपीएल दुसऱ्या देशात खेळवली जाणार आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र आज या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या सिईओ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल 2019 कोणत्या शहरात खेळवण्यात येईल यावरही चर्चा करुन या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या 12व्या हंगामासाठी 23 मार्च 2019 ही तारीख देण्यात आल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दरम्यान हे संपूर्ण वेळापत्रक संबधित अधिकाऱ्यांसोबत बोलून यावर निर्णय घेतला जाईल. सीईओ आयपीएल 2019 चे पूर्ण वेळापत्रक सादर करण्याआधी स्टेक होल्डर (भागिदार) यांच्यासोबतही चर्चा केली जाईल.

No comments:

Post a Comment