शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरला अपघात! सर्व जण सुखरूप

Monday, December 31, 2018

अहमदनगर : माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अहमदनगरमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले. नगरमधून हेलिकॉप्टरने टेक ऑफ केल्यानंतर तातडीने लँडिंग करण्यात आलं. हेलिकॉप्टरमधील सीटबेल्ट बाहेर राहिल्याने उड्डाण घेतल्यानंतर 7 मिनिटांनी हेलिकॉप्टरचं पुन्हा लँडिंग करावं लागलं. 

यावेळी मैदानावर सायकल चालवणारी मुले होती, त्यामुळे हेलिकॉप्टरचं अचानक पुन्हा लँडिग होऊ लागल्याने त्या मुलांचीही धांदल उडाली. मात्र, वेळीच सर्व मुले मैदानाबाहेर गेली आणि हेलिकॉप्टरचं नीट लँडिंग झालं. त्यानंतर सीटबेल्ट हेलिकॉप्टरमध्ये घेऊन हेलिकॉप्टरनं पुन्हा टेक ऑफ केलं. शरद पवार हे नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी पवारांसोबत तिथे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. पवारांनी या कार्यक्रमात अहमदनगरसह देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर पवार माघारी निघत असताना, नगरमध्ये हेलिपॅडवर हा अपघात टळला. सुदैवाने शरद पवारांना कोणतीही दुखापत झाली नाही. शरद पवार पूर्णपणे सुखरुप आहेत.

No comments:

Post a Comment