Thursday, December 6, 2018December 06, 2018
कांदा विक्रीतून आलेले पैसे थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर करून सरकारचं लक्ष वेधणारे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संजय साठे यांची चौकशी सुरु झाली आहे. संजय साठे यांची शासकीय कार्यालायकडून होणारी चौकशी आणि तयार केलेला कथित नकारात्मक अहवाल यामुळे ते व्यथित झाले असून इतकी गांधीगिरी करूनही थट्टाच होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्याने ही गांधीगिरी केल्यामुळे सरकारचा इगो हर्ट झालाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
29 नोव्हेंबर रोजी 150 रु प्रतिक्विंटल भावाने कांदा लिलाव केल्यानंतर आलेली 1064 रुपये ही रक्कम संजय साठे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवून कांदा उत्पादकांच्या व्यथेकडे लक्ष वेधण्यासाठी अभिनव प्रकार केला. टीव्ही 9 मराठी सर्वप्रथम ही बातमी दिली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर या गोष्टीची दखल घेण्यात आली. मातीमोल आणि तोट्यातील कांदा उत्पादकांना यामुळे दिलासादायक पाऊल उचललं जाईल अशी अपेक्षा असणाऱ्या साठे यांची उलटसुलट चौकशी सुरू झाली.
शेतकरी संजय साठे एखाद्या पक्षाशी संबधित आहे का, शेती किती, एखाद्या पक्षाने सांगितल्यावरून हा स्टंट केला का अशा अनेक अंगाने ही उलटसुलट चौकशी होत आहे. त्यामुळे साठे पुरते वैतागले आहेत. यातच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या विषयावर तयार झालेल्या अहवालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यातील आशयावरून त्यांना अधिकच धक्का बसला आहे.
कांद्याचे पैसे मोदींना पाठवणाऱ्या त्या शेतकऱ्याची चौकशी !

By Marathwada Neta
Thursday, December 6, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment