खरेदीचे पैसे तात्काळ देण्याच्या नाफेड, मार्केटिंग फेडरेशनला केल्या सूचना
_आठ दिवसांत पैसे शेतक-यांच्या बॅक खात्यात जमा होणार_
मुंबई, दि. १३ ------ नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या बीड जिल्हयातील तूर, हरभरा व मुगाचे पैसे पेरणीचे दिवस असल्याने शेतक-यांना तात्काळ द्यावेत, अशा सूचना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज नाफेड व मार्केटिंग फेडरेशनच्या अधिका-यांना दिल्या. दरम्यान ही रक्कम जिल्हयातील शेतक-यांच्या खात्यात आठ दिवसांच्या आत जमा होणार आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा मोठ्या प्रमाणात तुर व हरभरा व मुगाचे उत्पन्न झाले आहे. शेतकऱ्यांनी नाफेडच्या माध्यमातून तूर, हरभरा व मुगाची विक्री केली, काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले मात्र अनेक शेतकरी वंचित राहिले. ही बाब ना. पंकजाताई मुंडे यांना समजताच त्यांनी लगेचच सुत्रे हलवली. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर असून शाळाही सुरू होत आहेत. या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा, व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी नाफेडच्या माध्यमातून सरकारने तूर, हरभरा खरेदी केला. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. पेरणीचे दिवस असल्याने खत- बी बियाणे खरेदी तसेच शालेय आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे अॅडमिशन, फिस भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशाची गरज आहे. या बाबत कांही शेतकऱ्यांनी थेट ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधून आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांची अडचण तात्काळ लक्षात घेऊन पंकजाताई यांनी नाफेड व मार्केटिंग फेडरेशनच्या मुंबई येथील मुख्यालयाशी संपर्क साधत शेतकऱ्यांना सदर पैसे तात्काळ देण्याच्या सूचना केल्या.
*आठ दिवसांत पैसे बॅक खात्यात*
--------------------------------------
पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नाफेड मुख्यालय व मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक कानडे यांच्याशी बोलून शेतक-यांना तात्काळ रक्कम देण्याची सूचना केल्यानंतर शेतक-यांच्या बॅक खात्यात आठ दिवसांच्या आत पैसे जमा होणार आहेत. दरम्यान ना. पंकजाताई मुंडे यांनी तत्परता दाखवून रक्कम उपलब्ध करुन दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment