हिंगोली / प्रतिनिधी
शास्त्रामध्ये धर्म आचरणाचे पाच मार्ग सांगितले आहेत. यामध्ये यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय या पाच मार्गांचा समावेश आहें. पण आपण हे मार्ग विसरून भलत्याच मार्गाने वाटचाल करीत आहोत अशी खंत दत्तस्वरूप आप्पा बाबा यांनी व्यक्त करत सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी पुन्हा शास्त्रीय मार्ग अवलंबण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी २८ मे रोजी हिंगोली येथे प्रवचन करताना दिला.
अधिक मासानिमीत्त हिंगोलीतील भक्तगणांनी रूईभर संस्थान निवासी प.पु. आप्पाबाबा यांच्या उपस्थितीत धोंडे जेवणाचा कार्यक्रम येथील गोपाल लॉज येथे ठेवण्यात आला होता. पुढे बोलताना आप्पाबाबा म्हणाले की, आपण स्वार्थी होत असून शास्त्रीय मार्गाला तीलांजली देत आहोत. शास्त्रामध्ये धर्म आचरणाची पाच मार्ग सांगितली आहेत. ती समजुन घेवुन त्या पद्धतीने आपल्याला अनुकरण करावे लागे.
धर्म आचरणाची पाच शास्त्र मार्ग
यज्ञ
पुरातन काळात यज्ञाला अनन्य साधारण महत्व होते. यज्ञातुन यज्ञ पुरूष प्रगट होवून वरदान देत असे याचे उदाहरण म्हणजे राजा दशरतांनी केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ होय. पण आज कितीही मोठा यज्ञ केला तरी त्यामाधुन यज्ञ पुरूष प्रगट होत नाही. त्यांची कारणेही तशीच आहेत. यज्ञ करणारा आणि यज्ञ करून घेणारा योग्य कर्म करत नसल्याने ज्याला बगल मिळत आहे. त्यासाठी आहुती देणारा यजमान व यज्ञ विधी करणारा पंडीतही त्या दर्जाचा असावा लागतो. तेव्हा या गोष्टी घडत असतात.
दान
भारतीय संस्कृतीत दानाचे महत्व मोेठे आहे. पुर्वीपासूनच दान देण्याबाबत अनेक उल्लेख शास्त्रात आढळतात. दानामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार असून त्यातील पहिला म्हणजे पुरंतदान महापुण्य, दान दिल्यानंतर काही दिवसांनी होणारा फायदा व तिसरा प्रकार म्हणजे या जन्मी केलेल्या दानाचे पुढच्या जन्मी
होणारे फायदे हे दानाचे स्वरूप आहेत. पुर्वी साधु संत महंताला बस झाल म्हणेपर्यंत दान दिले जात होते. पण आज मात्र सत्यनारायणाला येण्यापुर्वीच दक्षणा किती देता असा सवाल विचारला जातो. यावरून दानातही व्यावसायिक स्वरूप आल्याचे त्यांनी बोलुन दाखवले. हे सगळ सोडुन निस्वार्थीपणे दान केले पाहिजे.
तप
तप करणे म्हणजे रिकाम्या वेळेत मनोरंजन करणे नव्हे तप करण्यासाठी देह, वाणी, किर्ती पवित्र असायला लागते. हल्ली तप करणारी माणसे कमी असून तपाचे सोंग करणारी माणसे पुढे आली आहेत. तप ही मोठी साधना आहे. आजकाल ठराविक लोक सोडले तर कोणीही नियमाप्रमाणे तप करत नाही. जैन मुनीकडे बघितले की तपाचे महत्व समजते. तपी लोकांचे दर्शन केल्याने आयुष्याचे कल्याण होते. असा मौलिक सल्लाही बाबांनी दिला. आजच्या तपाची परिस्थिती सांगताना बाबा म्हणाले की, गॅसवर दुध गरम करण्यासाठी ठेवायचे आणि तप करत बसायचे देवाच्या नामस्मरणापेक्षा त्या दुधाकडे जास्त लक्ष ठेवायचे हा तप नव्हे तर हे स्वतःला फसविणे होय.
कर्म
संसारीक जिवनासाठी कर्म हे अतिशन महत्वाचे आहे. गृहस्थ आश्रमातही कर्म करता येतात. यासाठी बाबांनी सुंदर उदाहरण दिले. भगवान दत्ताने सोळा अवतार घेतले. पण हे सोळाचे सोळा अवतार आकाशात किंवा जमिनीतुन न घेता संसारिक माणसाच्या घरातुन घेतले आहे. म्हणून गृहस्थ आश्रम हा सर्वश्रेष्ट आहे. या आश्रमातील उत्तम संतती म्हणजे सर्वश्रेष्ठ फळ होय. कर्मातुनच भगवंताशी जवळीक वाढते. त्यातुन ज्ञान मिळते. व ज्ञानातुन मुक्ती प्राप्त होत असते.
स्वाध्याय
स्वाध्याय म्हणजे वेगळे काही नसून दैनंदिन दिनक्रम होय. पण तो दिनक्रम योग्य असला पाहिजे. सकाळी उठुनप देव पुजा करताना त्यामध्ये भक्ती असणे गरजेचे आहे. नामस्मरणाने स्वाध्याय व्हावा जे करतो ते मनापासून करा केवळ ग्रंथ वाचुन काही होत नाही. त्यातुन काही तरी शिकले पाहिजे. तेव्हाच खर्या अर्थाने स्वाध्याय म्हणता येईल. पण आपल्या पद्धतीने दिनक्रम ठरवुन आवडीनुसार सवडीने वागणे म्हणजे स्वाध्याय नाही असे आप्पाबाबांनी सांगितले.
शास्त्रातील उपरोक्त या पाच मार्गाने धर्म आचरण होऊ शकते. त्याचबरोबर अधिक मासाविषयी बोलताना बाबा म्हणाले की, अधिक मास हा दान धर्मासाठी अतिशय महत्वाचा असतो. हा अधिक मास तर अधिकच महत्वाचा आहे. कारण यामध्ये गंगा दशहरा योग आहे. उत्तर भारतात नदी किनारी मोठे मोठे उत्सव केले जातात. त्यामुळे अधिक मासात आम्ररस, पुरणपोळीचे अन्नदान करून गुप्त दान केले पाहिजे असेही बाबा म्हणाले. शेवटी श्री. कृंष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा या भजनाने वातावरण भक्तीमय झाले होते. या प्रवचनाच्या कार्यक्रमानंतर शेकडो भक्तांनी धोंडा जेवणाचा महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सेठ गुंडेवार, ऍड. नितीन नायक, शैलेश मुदिराज, चंदुसेठ जयस्वाल, गोपाल अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिला, पुरूष भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment