जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरुच

Sunday, May 20, 2018

मुंबई : जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज दुसऱ्या दिवशीही संपावरच आहेत. काल जे. जे. रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती. यासंबधी जे. जे. मार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार लोकांना ताब्यात घेतलं आहे.

निवासी डॉक्टरांचा संप मिटवण्यासंदर्भात आज निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड' आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक प्रकाश वाकोडे यांची बैठक पार पडली. या बैठकीत आश्वासनापलिकडे काहीही हाती लागलं नसल्याची खंत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र प्रकाश वाकोडे यांनी याविषयी सखोल माहिती देण्याचं टाळलं.

No comments:

Post a Comment