दयानंद फार्मसी ची धनश्री चांडक नांदेड विद्यापीठातून सर्वप्रथम लातूर च्या दयानंद संस्थेचा गुणवत्ता पॅटर्न कायम

Thursday, August 30, 2018


लातूर, दि,२९,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा बी फार्म सी  २०१८ चा निकाल नुकताच आज विद्यापीठाने जाहीर केला असून  या परीक्षेत लातूर च्या  दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी च्या ची विद्यार्थिनी कुमारी धनश्री ओमप्रकाश चांडक  हिने चतुर्थ वर्षात हिने अंतिम परीक्षेत विद्यापीठातून सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला असून तिला १०४३ गुण मिळाले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा लातूर च्या शैक्षणिक क्षेत्रात दयानंद शिक्षण संस्थेचां लातूर पॅटर्न कायम राहिलेला दिसत आहे

दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद फार्मसी महाविद्यालयातून तृतीय वर्षासाठी प्रथम आलेली कुमारी रुपाली शिंदे, द्वितीय वर्षासाठी प्रथम आलेली कुमारी प्रतिमा केंद्रे, तर प्रथम वर्षासाठी प्रथम आलेली निकिता जोगाडे   उत्तीर्ण झालेल्या आहेत

सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमनजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद जी  सोनवणे, सचिव रमेशचंद्र बियाणी, सहसचिव सुरेश जैन, प्राचार्य डॉ व्हि ए म कलमसे, उपप्राचार्य के ए ल  सातपुते, डॉ ए एन देशपांडे, डॉ चाऊस, डॉ सोनवणे एस एम, प्रो आर आर सारडा, जिव्ही लोहिया, ए म सी पाटील, असीम काझी, एस जी सय्यद, एन एस हल्के, आर एस वाघमारे, एम बी मानके, आर एन गौड, ग्रंथपाल ए जी वारे यांच्यासहित अधिकारी कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थी यांचे कौतुक केले आहे

No comments:

Post a Comment