सोशल मीडियातून विष पसरवू नका :मोदी

Wednesday, August 29, 2018


वाराणसी :सोशल मीडिया हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे .परंतु या माध्यमाचा वापर चांगल्या बाबींसाठी करा, समाजात विष पसरवण्यासाठी त्याचा वापर होऊ नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

 वाराणसी मधील भाजपा कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते .मोदी म्हणाले की सोशल मीडियाचा वापर करणे चुकीचे नाही .परंतु हा वापर करताना चांगले काय आणि वाईट काय हे तपासले पाहिजे .एखादी चुकीची बाब आपण ऐकतो ,पाहतो आणि ती इतरांना पाठवतो .यामुळे नवे प्रश्न उपस्थित होतात. 

याऐवजी देश आणि समाजातील चांगल्या बाबींचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा. कुठल्याही राजकीय पक्षाबाबत आपण बोलत नाही. सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडियाचा वापर जपून केला पाहिजे .अनेक वेळा स्त्रियांबाबत सोशल मीडियातून आक्षेपार्ह लिखाण केले जाते .

लोक सभ्यतेच्या मर्यादा ओलांडतात चांगल्या समाजासाठी हे धोकादायक आहे .या बाबी टाळता आल्या पाहिजेत. यातूनच समाजामध्ये चुकीचा संदेश जातो .प्रत्येकाने सोशल मीडिया जपून वापरला तर विष पसरवण्याचे असे प्रकार थांबू शकतात असेही मोदी म्हणाले.

No comments:

Post a Comment