ना.निलंगेकर अन आमदार देशमुख यांच्यात जुगलबंदी रंगते तेव्हा . . .

Monday, February 11, 2019
लातूर दि प्रतिनिधी 
येथील ऑफिसर्स क्लबच्या भूमिपूजन प्रसंगी ना संभाजीराव पाटील व लातूर शहराचे आ . अमित देशमुख हे दोघे एकाच व्यासपीठावर होते . दोघे कानात बोलत होते या मुळे ते दोघे काय बोलले या चर्चेला उधाण आले असून चांगलीच जुलगबंदी झाली . निलंग्याचा प्रसिद्ध दगड येथे वापरण्याची सूचना येथे केली होती आणि या किंगल दगडांमुळे इमारतीचे सौंदर्य चांगले दिसेल असही ना संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले 

दोन भैयांच्या कान गोष्टीने लातुरात चर्चाना उधाण  


वातावरणातील थंडी अन 
राजकीय गर्मी वाढू लागली 
आपल्या भाषणात ना संभाजीराव पाटील लिनलगेकर म्हणाले कि वातावरणातील थंडी आजपासून कमी झाली आहे अन राजकीय गर्मी वाढू लागली आहे निवडणुकीला सामोरे जात असताना दोघे एकत्र आलो बरे झाले या मुळे चांगले वातावरण राहते मी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणालो मी एकटा भूमिपूजन करणार नाही आपण स्थानिक आमदारांना पण  बोलावा . आमच्यात मतभेद झाले पण मतभेद नाहीत आमचे जुने संबंध चांगले आहेत असंही या वेळा संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले . 

लाडके पालकमंत्री 
भाषणाच्या सुरवातीलाच आ अमित देशमुख यांनी संभाजीराव पाटील निलंगेकर यांना लाडके पालकमंत्री असं म्हणतात अनेकांनी भुवया उंचावल्या

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9333333548  हा आमचा नंबर

अनेक सुपीक कल्पना 
आ अमित देशमुख भाषणात म्हणाले कि आमच्या डोक्यात अनेक सुपीक कल्पना येतात पण बऱ्याच वेळा गडबड होते पॉलिटिकनिक च्या व्हॉलीबॉलच्या मैदानावर पाणी टाकणे सुरु होते दुष्काळात पाण्याचा दुरुउपयोग अश्या महाराष्ट्र भर बातम्या झळकल्या नेमके त्या वेळा माझा वाढदिवस होता असेही ते म्हणाले . 

आम्ही कानात बोलत असताना अनेकांना त्याचीच काळजी होती कि आम्ही काय बोलत होतो आणि या मुळे तात्या , काका , आण्णा यांना त्रास होणार . लातूरच्या जडणघडणीत कधीच कुणीच राजकारण केले नाही आम्ही विकासात राजकारण आणत नाही असेही या वेळा आ अमित देशमुख म्हणाले 

निलंग्याचा दगड स्वीकारला 
या ठिकाणच्या बांधकामासाठी निलंग्याचा दगड स्वीकारला असे सांगून अमित देशमुख हे संभाजीराव पाटील यांच्या भाषणावेळीस म्हणाले कि आम्हाला कार्यक्रमाचे निमंत्रण मिळायचे त्या वेळा ना संभाजीराव म्हणाले कि आम्ही निमंत्रण द्या म्हणून सांगायचे त्या वर अमित देशमुख म्हणायचे काही दगडे आडवे यायचे . 

तात्पर्य या कार्यक्रमात सौंदर्याचे दगड आडवे येणारे दगड याची जोरदार कुजबुज होती प्रास्ताविक जी श्रीकांत यांनी दुष्काळ आणि भूकंपामुळे हा प्रकल्प होण्यास वेळ लागला ३. ५ एकर जागेवर हा प्रकल्प होणार आहे . १० महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल असेही सांगितले आभार निवासी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी मानले संचलन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले तर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जिल्हाधिकारी जी श्रीकांत , कॉन्ट्रॅक्टर सतीश महिश्वरी ,आर्किटेक्चर कृष्णकुमार बांगड यांनी केले कार्यक्रमास अधिकारी लोकप्रतिनिधी , उद्योजक ,व्यापारी ,डॉक्टर मोठ्या संख्येने होते . 

ऑफिसर्स क्लबला ऐतिहासिक लुक द्यावा 
लातूर च्या ऑफिसर्स क्लबला ब्रिटिश लुक न देता त्या वस्तूला गडी , वाडा किल्ला या प्रकारचा ऐतेहासिक लुक द्यावा असे मत पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले या वेळा प्रमुख पाहुणे म्हणून लातूर शहराचे आ अमित देशमुख हे होते व्यासपीठावर जिल्हाधिकारी जी श्रीकांत , पोलिस अधीक्षक माने , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर , मनपा आयुक्त कौस्थुभ दिवेगावकर ,आय ए एस राहुल गुप्ता ,महापौर सुरेश पवार हे होते .

 आमच्या बातम्या आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 


No comments:

Post a Comment