तोतया पोलिसाने कारसह 30 लाख पळविले!

Saturday, December 22, 2018



विशेष प्रतिनिधी
नांदेड-शहरातील मुख्य वर्दळीची बाजारपेठ असलेल्या तरोडेकर मार्केट परिसरात उभी असलेली कार नोपार्किंगमध्ये असल्याची बतावणी करुन शहर वातुक शाखेच्या एका पोलिसाने कार चालकाच्या ताब्यातून कार घेवून पळून गेला. या कारमध्ये रोख 30 लाख रुपयांची बॅग होती. बडोदा बँकेतून ही रक्कम काढण्यात आली होती. हा प्रकार सायंकाळी 6.10 वाजता घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.



बडोदा बँकेतून रोख 30 लाख रुपयांची रक्कम काढून एमएच-19 बीजे-9975 या पांढर्‍या रंगाच्या इंडिको कारमध्ये रक्कमेची बॅग ठेवण्यात आली होती. वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केट परिसरात ही कार उभी करुन कार मालकाने दुकानात गेला असता कारमध्ये कारचालक हा बसून होता. तेवढ्यात एक वातुक शाखेचा गणवेशधारण केलेला पोलिस कर्मचारी त्या कारजवळ आला. ही कार नोपार्किंग झोनमध्ये थाबविली असल्यामुळे नोपार्किंगची केस करण्यासाठी त्या वाहतुक शाखेच्या पोलिसाने कार चालकाला कारखाली उतरवून स्वत: चालकाचा ताबा घेतला. कार चालू केल्यानंतर वाहतुक शाखेत येवून दंड भरुन कार घेवून जाण्याची सूचना करुन त्या तोतया पोलिस कर्मचार्‍याने 30 लाख रुपयाच्या बॅगसह कार पळून घेवून गेल्याची घटना घडली.


दुकानातील काम आटोपून कारमालक कारजवळ आला असता चालकाने कार वाहतुक शाखेच्या पोलिसाने वाहतुक शाखेत घेवून गेला असून दंड भरुन कार घेवून जाण्याची सूचना दिली असल्याची माहिती दिल्यानंतर कारचा चालक व मालकाने वजिराबाद पोलिस ठाण्यातील वाहतुक शाखेचे कार्यालय गाठले. त्या पोलिस कर्मचार्‍याने आपली कार वाहतुक शाखेत आणली नसल्याचे पाहून कार मालकाला धक्काच बसला आहे. ज्या वाहतुक कर्मचार्‍याने कार घेवून गेला त्या कारमध्ये रोख 30 लाख रुपयांची बॅग होती असे कार मालकाने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांत एकच खळबळ उडाली.

या घटनेची गंभीर दखल घेवून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी शहराच्या सर्वच मुख्य रस्त्याची नाकाबंदी करण्याचे आदेश जारी करुन पांढर्‍या रंगाच्या इंडीका कार क्र.एम.एच.-19-बीजे-9975 हा क्रमांक सर्वत्र बिनतारीसंदेशाव्दारे पोलिस ठाण्यांना कळविण्यात आला. 30 लाखाची रोकडसह कार घेवून पसार झालेला हा तोतया पोलिस लातूरच्या दिशेने गेला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणी कार चालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

No comments:

Post a Comment